अखेर खातेवाटप जाहीर ! पहा कोणत्या मंत्र्याला मिळाले कोणते खाते ?

अखेर खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याला मिळाले कोणते खाते

मंत्रिमंडळातील नवीन नियुक्त मंत्र्यांच्या खाते वाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये देखील काही फेरबदल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी खातेवाटप पास मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: 

अजित पवार – अर्थ आणि नियोजन
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – कृषी
छगन भुजबळ – ग्राहक संरक्षण अन्न व नागरी पुरवठा
अनिल पाटील –आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन,
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य
संजय बनसोडे – बंदरे व क्रीडा व युवक कल्याण,
आदिती तटकरे – महिला व बालविकास
धर्मरावबाबा आत्राम- औषध व प्रशासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *