पिक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत .पंतप्रधान प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र कडून अतिरिक्त रकमेची मागणी होत आहे. असं काही आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सतार म्हणाले.
पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत
राज्य शासनाने खरीप हंगामासाठी या पोर्टलवर शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा पिक विमा उतरवण्याची योजना जाहीर केली आहे.राज्यात त्याची अंमलबजावणी निवडलेल्या नऊ विमा कंपन्यांमार्फत सुरू आहे. विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी त्याची अंतिम तारीख 31 जुलै असून पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येते.
एक रुपया व्यतिरिक्त जादा रक्कम घेतल्यास कारवाई करावी
राज्यात विविध ठिकाणाहून सामूहिक सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना कडून एक रुपया व्यतिरिक्त ज्यादा रक्कम घेत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक रुपयात व्यतिरिक्त ज्यादा रक्कम देऊ नये .अशा प्रकारची माहिती सामायिक सेवा केंद्र व ग्रामपंचायत बाजार समिती या ठिकाणी प्रदर्शित करावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक
एक रुपयात पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय सध्या महाराष्ट्रातील सरकारने घेतला आहे .महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पनात ही घोषणा केली होती ही योजना खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2023 24 ते 25 – 26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घोषणापत्र ,सातबारा उतारा ,आधार कार्डशी ,संलग्न असलेले बँकेचे पासबुक सामाईक खातेदार असल्यास द्यावयाची संमती पत्र ही कागदपत्रे लागतात.