शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही निर्णय घेतले होते. सरकारने या अधिवेशनामध्ये एक रुपयात पिक विमाची घोषणा देखील केली होती .परंतु त्याचा शासन निर्णय काढला नव्हता. मात्र आता राज्य शासनाने यावर आत्ताच शासन निर्णय काढला आहे.
आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा चा लाभ घेता येणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाने पीक विमा योजना आता लागू करण्याचा आदेश जारी केला आहे .त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पाच प्रकारच्या नुकसानीचा लाभ घेता येणार आहे. यासाठी पिक विमा पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच नगदी पिकांसाठी पाच टक्के हिस्सा द्यावा लागतो.
परंतु आता पिक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे