बोगस बियाणे खत विक्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरात सुरू आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पोलिसांनी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कारवाई केलेली आहे.कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यात एका ठिकाणी बोगस खत साठ्यावर कारवाई केली.त्यामध्ये 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जैव उत्प्रेरक या नावाची बोगस खत सापडले .17 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ट्रक मध्ये मिळाला .या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पंचायत समिती कृषी विभागाने तालुक्यातील नाका पार्डी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत किती जणांना बनावट विकलेले आहे. यांची किती जणांची टोळी आहे .या सगळ्याची चौकशी करण्यात येणार आहे.
ट्रकचालक हरीश मनु कोकण, वाहक हेमंत धनराज मराठे या दोघांना कारवाई दरम्यान ताब्यात घेतले आहे. जिल्हा कृषी अध्यक्ष कार्यालयात या प्रकरणाबाबत माहिती मिळताच कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामपंचायत नाकापाडी येथे उभा असलेल्या ट्रकमध्ये जैव उत्प्रेरक नावाची बोगस खत होते .बोगस खतांची निर्मिती करून शेतकऱ्यांना लुटण्याची काम काहीजण करत आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत कित्येक जणांवर कारवाई केली आहे. कृषी अधिकारी प्रमोद लव्हाळे यांनी बोगस खत असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिकडे ताबडतोब धाड टाकली.
त्यावेळी तिथे एक महिला आणि काही लोक खतांची विक्री करताना आढळून आले.तिथल्या लोकांना पोलीस असल्याची माहिती मिळताच त्यांनी पळ काढला पोलिसांनी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी 17 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या लोकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून फरार झालेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.