
जून २०२३ मध्ये शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता . गेल्या दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा भरू शकतात . लवकरच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकते प्रमाणे सहभागी होता येईल. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असून लवरकच अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती आहे.
अर्ज कोठे करता येईल?
पीकविमा योजनेत रब्बी हंगामात सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मुदतीत विमा काढावा. लवकरच पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होईल.तुम्ही स्वतः तसेच बैंक, विमा कंपनी प्रतिनिधी, व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत pmfby पोर्टल, pmfby.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.
उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार..
२०२३ पासून सन २०२५-२६ पर्यंत या तीन वर्षांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनामार्फत शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम भरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ प्रती अर्ज १ रुपयात नोंदणी करून योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.
अधिसूचित पिकांचा काढा विमा..
पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. जिल्ह्यात हरभरा, रब्बी कांदा ,रब्बी गहू बागायती,हे पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. ७० टक्के असा जोखीम स्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी निश्चित करण्यात आला आहे.
खरीप हंगामप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ १ रुपयामध्ये नोंदणी करून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. रब्बीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुदतीत अर्ज करून योजनेमध्ये सहभाग घ्यावा.