![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/पिक-विम्याची-रक्कम.webp)
राज्यातील अनेक भागात डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. शेती पिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. विशेषत:मोठ्या प्रमाणात फळ बागांचे नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता. नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादकानी या पिकांचा पिक विमा काढला होता. या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे. या जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे.
हेक्टरी मिळाली 43 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई…
नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपई फळ बागांना डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी यावेळी केळी आणि पपई बागांचे हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरवा केला होता. त्यावर आता , फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे. 2 कोटी 98 लाखाची मदत विमा कंपनीने देण्यास सुरवात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 43 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश ?
शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, कीटकांचा प्रादुर्भाव ,चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस,तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाले तर झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा फटका बसतो.यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे.
‘या’ कारणामुळं झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण..
हवामानातील बदलामुळे पिकाची पेरणी किंवा लावणी नाही झाली तर होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळं पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत या अडचणी आल्या तर उत्पन्नात येणारी घट,पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे काढणीच्या अगोदर होणारे नुकसान अशा अनेक प्रकारच्या जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते.