गहू ,तांदूळ ,साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पहा सविस्तर ..

गहू , तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री पियुष गोयल यांनी वर्तवला आहे .

भारत हा गहू , तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात मर्यादित केली .या निर्बंधांमुळे यावर्षी सुमारे ४ ते ५ अब्ज डॉलर्सची कमतरता होण्याची शक्यता  गेल्या महिन्यात नोंदवली होती. परंतु निर्बंध असूनही भारताच्या यावर्षीच्या कृषी निर्यातीवर $53 अब्ज डॉलर वाढीची अपेक्षा आहे . असे देशाचे व्यापार मंत्री यांनी सोमवारी सांगितले.

“आम्ही 2022-23 या वर्षांमध्ये सुमारे $53 अब्ज डॉलर्सची कृषी निर्यात केली होती आणि आम्हाला तांदूळ , गहू किंवा साखरेच्या निर्यातीवर निर्बंध असतानाही चालू वर्षात ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे,” असे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या परिषदेत सांगितले.

राज्य-संचालित व्यापार संस्था APEDA च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मांस आणि दुग्धजन्य पदार्थ , तृणधान्ये आणि फळे आणि भाज्याची निर्यात वाढली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *