Pankaja Munde : धनंजय मुंडेंनी पंकजांवर केली होती घाणेरडी टिका.. आता बीडमध्ये पुन्हा ‘पंकजा’ सक्रीय होणार?

Pankaja Munde : मस्साजोग हत्याकांड प्रकरण आणि त्याच्याशी असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्ष संबंध यावरून वातावरण तापल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांना तो द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद हे औट घटकेचेच होते.

या सर्व प्रकरणात त्यांच्या चुलत भगिनी असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र कुठलेही सार्वजनिक विधान न करता राजकीय समजदारी किंवा पॉलिटिकल मॅच्युरिटी दाखवली. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांनी थेट त्यांनाच खडे बोल सुनावले. हे सर्व पाहता मागची दहा वर्षे पक्षांतर्गत राजकारणामुळे मागे पडलेल्या पंकजा मुंडे आता बीड जिल्ह्यात पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

बीडच्या राजकारणात एकूणच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव राहिलेला आहे. ते हयात असेपर्यंत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व बीड जिल्ह्यावर होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजा आणि डॉ. प्रीतम यांनी बीड जिल्ह्याचे राजकारण करून आपल्या वडिलांचा प्रभाव कायम ठेवला. मात्र नंतर सत्तेत असताना त्यांच्यावर विविध आरोप झाल्याने त्यांना हळूहळू बाजूला करण्यात आले आणि अंतर्गत राजकारणाच्या पंकजा बळी ठरल्या. दरम्यानच्या काळात चुलतबंधू धनंजय मुंडे यांचा पक्षाची सत्ता आली आणि जवळपास मागच्या दहा वर्षापासून ते सत्तेत किंवा सत्तेच्या जवळ होत. त्यातूनच त्यांनी वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ दिले आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील वातावरणच दुषीत झाले. मराठा समाजाचा रोष आणि मोर्चांना सुरूवातही याच काळात झाली तीही बीड जिल्ह्यातून एकूणच धनंजय मुंडे सत्तेत असताना बीड जिल्हयाचे वातावरण कलुषित आणि गुन्हेगारी स्वरूपाचे होत गेले. मात्र आता मुंडे सत्तेवरून पाय उतार झाल्याने पंकजा मुंडे यांचे महत्त्व वाढू शकते, किंबहुना त्या स्वत: बीडची सूत्रे हातात घेऊ शकतात असे सांगितले जात आहे. त्यातून येणाऱ्या काळात बीडचे नेतृत्व पुन्हा स्व. गोपीनाथ मुंडे याच्या वारसांकडे जाऊन बीडची स्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Reply