
☘️ नोंदणी कालावधी: शेतकरी स्वतः १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ई-पीक पाहणी करू शकतात.
☘️ फोटो घेण्याचे नियम: पिकांचा फोटो शेतीच्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत घेणे आवश्यक आहे. अॅप GPS वापरून फोटोची योग्यतता तपासतो.
☘️ अॅप वापरण्याची प्रक्रिया:
➡️Digital Crop Survey अॅपचे व्हर्जन 4.0.0 वापरावे
➡️अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे
➡️ मोबाईलमध्ये इंटरनेट आणि GPS चालू असणे आवश्यक
➡️ सहायकांची मदत: प्रत्येक गावासाठी एक पीक पाहणी सहायक नेमण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी पूर्ण करावी, पण अडचण आल्यास सहायकांची मदत घेता येईल.
➡️सहायक स्तरावरील नोंदणी कालावधी: १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहायक उर्वरित क्षेत्राची नोंदणी करतील.
➡️ या योजनेचे फायदे:
☘️ शासनाला खरीप उत्पादनाचे अंदाज अचूकरीत्या मिळतात.
☘️ शेतकऱ्यांना विमा, अनुदान व सरकारी योजनांच्या लाभासाठी योग्य माहितीचा आधार मिळतो.
☘️ पीक नुकसानीच्या वेळी मदतीचे प्रमाण निश्चित करण्यास मदत होते.