कांदा बी उळे टाकण्यासाठी मशिन
फायदे..
कांद उळे (बी) समान अंतरावरच पडेल दाट – पातळ होणार नाही.
वाऱ्याने (हवेन) उळे उडनार नाही, उळयाची २५ टक्के बचत.
कमरेला व मानेला त्रास होणार नाही, वेळेची ८० टक्के बचत
ऊळे (बी) समान अंतरावर पडल्यामुळे रापाची कांडी एक सारखी तयार होईल.
रोपाची कांडी एक सारखी असल्यामुळे कांदयाची प्रत एकसारखी तयार होईल. त्यामुळे आपल्या कांदयाला उत्तम भाव मिळेल.
रोपाची कांडी समान असल्यामुळे लागवडीची व रोपाची २५ टक्के बचत होईल.
आपण पारंपारिक पध्दतीने टाकलेल्या उळयाची कांडी जाड बारीक असल्यामुळे कांदयाची ३ ते ४ वेळेस विरळणी करावी लागते.
मशिनने टाकलेल्या रोपाची कांडी समान असल्यामुळे १ ते २ विरळणीत शेत रिकामे होईल व आपल्याला त्या शेतात दुसरे पीक लवकर घेता येईल.