घर / घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पहा सविस्तर

घर घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पहा सविस्तर

घरपट्टी नावावर करण्यासाठी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा कधीतरी नक्की पडला असेल त्यासाठी काय करायचं ?  घरासंबंधित एक ना अनेक कामे असतात. काही कामे कायद्याला धरून करावी

लागतात. ही कामे रीतसर त्या-त्या वेळी पूर्ण न झाल्यास पुढे व्यत्यय येतो. यांत ‘घर नावावर करणे, वारस दाखला काढणे, घरपट्टी नावावर करणे अर्ज कसा भरायचा’ यासारख्या कामांचा समावेश होतो. तुम्ही संबंधितां समवेत किंवा तज्ञांशी चर्चा करून याची सखोल माहिती घ्यायला हवी.

आता घरपट्टीचा अंतर्भाव मालमत्ता करामध्ये होतो. व्यक्तिच्या किंवा संस्थांच्या अधिकारात असलेल्या मालमत्तेवर ‘मालमत्ता कर’ आकारण्यात येतो. ती मालमत्ता स्पर्श करण्याजोगी अर्थात टॅन्जेबल असावी. त्यांत घर, सदनिका, संस्था इत्यादींचा समावेश होतो. मालमत्ता कर ‘प्रॉपर्टी टॅक्स, घरफाळा, घरपट्टी’ अशा नावांनी ओळखले जाते.  

नव्याने बांधलेल्या घराची घरपट्टी नावावर करण्याकरीता त्या घराची नोंदणी करावी. त्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या ठिकाणी तुम्हांला अर्ज द्यावा लागेल. तुम्ही हा अर्ज ग्रामसेवक, सरपंच अथवा संबंधित अधिकाऱ्याच्या नावाने करू शकता.

त्या अर्जा समवेत खाली नमूद केलेली काही कागदपत्रे जोडायची असतात. त्या कागदपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेनंतर ठराविक कालावधीत तुमच्या घराचा उतारा तुम्हांला सुपूर्त करण्यात येतो. नंतर, तुमच्या नावे घरपट्टी आकारणी सुरु होते. 

आवश्यक कागदपत्रे

◼️ ७/१२ उतारा

◼️ ओळखपत्र

◼️ चतु:सीमा स्टॅम्प

◼️संमती पत्रक

◼️ जागेचं खरेदी खत

◼️ वारस हक्क प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

◼️ मृत्यु प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *