फसवणुकीचा नवा फंडा : अनोळख्या मोबाइल नंबर वरून लिंक पाठवली जाते आणि तुम्ही जर एलआयसी बोनसची बोगस लिंक ओपन केली तर तुमचे खाते रिकामे होईल. एलआयसी कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त बोनसचे तुम्ही लाभार्थी ठरला आहात’ असा मेसेज आणि एक लिंक सायबर चोरटे अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठवत आहेत.
तुम्हाला समजत असलेल्या भाषेत कोणीतरी तुमच्याशी बोलल्यानंतर, ते तुम्हाला एका विशेष वेब पृष्ठावर क्लिक करून किती पैसे मिळाले हे तपासण्यास सांगतील. परंतु जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पृष्ठावर क्लिक केले तर तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब होऊ शकतात. म्हणून, ज्यांच्याकडे विमा आहे त्यांनी सावधगिरी बाळगणे आणि या धोक्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये आणि तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने सामान्य नागरिकांना अशा गोष्टींचा सामना करणे कठीण होत आहे. फसवणुकीचे नवनवीन फंडे सायबर चोरटे शोधून काढत आहेत. LIC बोनस नावाने फसवणुकीचा नवा मार्ग उघडकीस आला आहे.
एलआयसी बोनसच्या नावाने सायबर चोरट्यांनी एलआयसी एजेंट यांच्यासह पॉलिसी धारकांना लिंक पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही लिंक मोबाइलधारकांनी ओपन केल्यास त्यांची
बँक खाते क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी महत्त्वाची वैयक्तिक माहिती चोरांना मिळू शकते.
या माहितीचा वापर करून ते एखाद्याच्या बँक खात्यातून फार लवकर पैसे काढू शकतात. फसवणूक झालेल्या व्यक्तीने चोराशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास फोन बंद असल्याचे त्यांना आढळेल.त्यामुळे एखाद्या अनोळखी क्रमांकावर आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका आणि आपले बैंक खाते क्रमांक व वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका, असे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे. ग्राहकांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
कोणतीही लिंक LIC पॉलिसीधारकांनी ओपन करू नये. कुठल्याही प्रकारची कोणालाही माहिती देऊ नये, जो तुमचा एलआयसी एजेंट आहे तो तुमची काळजी घेतो. तुमच्या पॉलिसीसंदर्भातील सर्व सेवांबाबत पॉलिसीधारकांनी फक्त एलआयसी एजेंट किंवा एलआयसी बॅचमार्फत चौकशी करावी.
– कमलेश गांधी, एलआयसी एजट
त्या लिंकवर क्लिक केल्या वर त्या व्यक्तीची , संपर्क क्रमांक, वैयक्तिक माहिती, फोटो याचा अॅक्सेस सायबर चोरट्यांना मिळत आहे. तुमच्या संपर्क यादीतील लोकांना तुमच्याच नावाने मेसेज करून त्यांनी अशी पॉलिसी घेतली आणि त्याना असा फायदा झाला असे सांगितले जाते.
संपर्क यादीतील लोकांना टेस्टीमोनिअल करून मेसेज पाठविले जातात. त्या मध्ये हजारांपैकी शंभर लोक फसतात. अशा हाईप नावाच्या काही साइट्स आहेत, जिथे व्हर्च्यूअल क्रमाक मिळतात.एका महिन्याचे पैसे मोजले की कोणत्याही देशाचा क्रमांक मिळतो. तो क्रमांक सगळीकडे रूट केलेला असतो. त्यामुळे अशा अनोळखीक्रमांकावरील लिंक ओपन करू नयेत.– रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ