वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन ब्रिटिश सरळ वान व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची राष्ट्रीय निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
विद्यापीठांतर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रित बीटी क्राय एक एसी जणूक तंत्रज्ञान युक्त वाणाची पैदास करण्याचे कार्य सुरू असून याद्वारे निर्मित एन एच 1901 बीटी एन एच, 1901 एनएच, 1902 बी टी एन एच 1904 बीटी ही तीन अमेरिकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीद्वारे नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मध्य महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश विभागाकरिता प्रसारित करण्याची निवड करण्यात आली आहे.
तसेच विद्यापीठ अंतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र मेहबूब बाग या केंद्रद्वारे निर्मित देशी कापूस सरळ वाण पीए 833 हा वाण देखील समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता आंध्र प्रदेश, तळमिळनाडू, कर्नाटक प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे.
परभणी कृषी विद्यापीठ विकसित कापूस सरळ वनात शेतकरी बांधवांचा बियाण्यांवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार असून हे वाण कोरडवाहू लागवडीमध्ये उत्पादनात सातत्य देणारे वान आहे.
महाराष्ट्र बाहेरही मध्य प्रदेश व गुजरात या राज्यात या वाणाची लागवड करिता मान्यता दिली आहे. सरळ वाण बीटी परवर्तित करणारे परभणी कृषी विद्यापीठ राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे.
सार्वजनिक क्षेत्रांमध्ये बीटी सरळ वाण प्रसारित करणारे परभणी कृषी विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले असून बीटी कापूस लागवडीस सुरुवात झाल्यापासून खाजगी कंपनीद्वारे कापसाच्या संकरित वाण निर्मिती वरच भर होता. कोणतेही खाजगी कंपनीद्वारे कापूस पिकाचे बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आले नाही.
सरळ वाणाचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पदित कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षापर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बियाणे आणण्याची गरज नाही, पर्यायाने बियाणांवरील खर्च वाचणार आहे.
हे सरळ वाण असल्यामुळे त्यांना रासायनिक खताची आवश्यकता संकरित वाण्यापेक्षा कमी लागते. विद्यापीठ विकसित रस शोषक करणाऱ्या किडींना सहनशील असल्यामुळे कीड संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चामध्ये कपात करता येणार आहे. हे वाण कोरडवाहू लागवडीमध्ये मध्य भारतातील विविध केंद्रावर या वाणाचे उत्पादनामध्ये सातत्य आढळून आले आहे. जिवाणूजन्य करपा, पानांवरील टिपके ,रस शोषक किडी या रोगांकरिता सहनशील आढळून आले आहे. या बीटी सरळ वाणाचा रुईचा उतार 35 ते 37% असून धाग्यांची लांबी मध्यम ,मजबुती सरस आहे.
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे संशोधन कार्य
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विकसित एन एच एच 250 व एन एच एच 715 या अमेरिकन संकरित वाणाची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या सहकार्याने बोल गार्ड दोन स्वरूपात रूपांतरित करण्याची कार्य प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन कपाशीचे विनियंत्रित बीटी क्राय 1 एसी व क्राय एबी जनुक तंत्रज्ञान युक्त स्वरूपातील सरळ आणि संकरित वाणाची पैदास करण्याची कार्य चालू असून मोठ्यात आकाराचे बोंडे सघन लागवडीस उपयुक्त आणि कमी कालावधीचे कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे विकसित करण्यात येत आहे.