शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे खूप महत्त्वाचे आहे.कारण जर हातात पैसा नसेल तर शेतीची कामे वेळेवर करता येत नाही व त्याचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज ही खूप महत्त्वाची बाब आहे. पिक कर्जाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठे महत्त्व आहे.
तसे पाहायला गेले तर सरकारच्या माध्यमातून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. परंतु बँकांच्या माध्यमातून दिले जाणारे पीक कर्ज मात्र वेळेवर शेतकऱ्यांना बऱ्याचदा मिळत नाही. या सगळ्या पीक कर्जाच्या किंवा इतर कर्जाच्या पार्श्वभूमीवर जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार बँक कर्ज देत असते.
साधारणपणे एक एकर क्षेत्रावर किती कर्ज मिळू शकते? हे एक माहितीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना माहित असणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणून या लेखामध्ये शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज व किसान क्रेडिट कार्ड चे फायदे जाणून घेणार आहोत.
एक एकर जमिनीवर किती कर्ज मिळू शकते व ते कसे मिळते?
साधारणपणे जमिनीच्या क्षेत्रनिहाय विचार केला तर एक एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 30 हजारापर्यंत कर्ज मिळते. परंतु जर शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर या माध्यमातून किमान 50 ते कमाल तीन लाखापर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे.
म्हणजेच एका एकर साठी तीस हजार व जास्तीत जास्त दहा एकर जमीन असेल तर तीन लाख कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जासाठी प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे.
शेतकऱ्याला मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप हे त्याचे उत्पन्न तसेच त्याचे जमिनीचे क्षेत्रफळ व गेल्या वर्षीचे पीक यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वार्षिक सात टक्के व्याज दराने कर्ज मिळते. तसेच महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या माध्यमातून जर वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्याला सात टक्के व्याज दरात तीन टक्के सवलत दिली जाते म्हणजे शेतकऱ्यांना फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज परतफेड करावे लागते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळतो.
किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
1- तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कोणत्याही सरकारी बँकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागेल .
2- त्या ठिकाणी केसीसी रजिस्ट्रेशन या ऑपशन वर क्लिक करून संपूर्णपणे फॉर्म भरून घ्यावा लागतो.
3- तुम्हाला फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे व कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती न भरता लागणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत व व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
4- तुम्ही कागदपत्रे जेव्हा अपलोड कराल तेव्हा फॉर्मच्या खाली तुम्हाला सबमिट या ऑपशन वर क्लिक करायचे आहे. किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज अशा पद्धतीने तुम्ही करू शकता.
ऑफलाइन अर्ज किसान क्रेडिट कार्डसाठी कसा करावा?
1- याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जावे लागेल.
2- तुम्हाला बँकेतील अधिकाऱ्यांनकडून किसान क्रेडिट कार्ड साठी ची माहिती घावी लागेल .
3- किसान क्रेडिट कार्डसाठी दिला गेलेला फॉर्म तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यांकडून भरावा लागेल.
4- त्या फॉर्मवर विचारलेली सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे असून यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकणे आवश्यक आहे.
5- सर्व कागदपत्रे फॉर्म भरून झाल्यानंतर त्याला जोडावीत.
6- त्यानंतर कागदपत्रे व फॉर्म बँकेच्य अधिकरांकडे द्यावेत.
7- त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड करिता आवश्यक प्रक्रिया बँकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल.
8- स्पीड पोस्ट च्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरी किसान क्रेडिट कार्ड पाठवले जाते.
किसान क्रेडिट कार्डकरिता लागणारे कागदपत्रे
जमिनीचा सातबारा
मतदान कार्ड
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट साईज फोटो