या योजनेमुळे वृद्ध शेतकऱ्यांना मिळणार मोफत उपचार, कसे काढायचे कार्ड..

अलीकडेच केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना असे योजनेचे नाव असून त्या अंतर्गत नागरिक आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करवून घेऊ शकतात. ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण त्यासाठी एक कार्ड तयार करण्याची गरज आहे.

70 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान वय वंदना कार्डासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 10 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या कार्डासाठी नोंदणी करत, या योजनेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत (एबी पीएम-जेएवाय) मोफत आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी पात्र बनवते. 29 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. आयुष्मान वय वंदना कार्डासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये सुमारे 4 लाख महिला आहेत.

आयुष्मान वय वंदना कार्ड सुरू केल्यानंतर 70 वर्षे आणि त्यावरील वयाच्या 4800 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना 9 कोटी रुपयांच्या उपचारांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 1400 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. या उपचारांमध्ये अँजिओप्लास्टी, नितंब फ्रॅक्चर/प्रत्यारोपण, पित्ताशय काढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रोस्टेट पुनर्रचना आणि स्ट्रोक यांसारख्या विविध आजारांचा समावेश आहे.

कसे काढावे कार्ड..

आयुष्यमान भारत अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये टाकून हे कार्ड घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत तयार करता येते. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड आणि आधार कार्ड, आधार संलग्न मोबाईल क्रमांक यांची आवश्यकता आहे. ज्यांनी यापूर्वी आयुष्यमान भारत कार्ड काढले असेल, त्यांना त्या कार्डचा क्रमांक वापरून हे कार्ड काढता येईल.
वय वंदना योजनेचे कार्ड काढण्यासाठी आयुष्यमान भारत अ‍ॅपवर जावे लागते. तिथे आधारकार्ड क्रमांक आणि फोन क्रमांक वापरून हे कार्ड काढता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *