निवडणुकीनंतर पुण्याच्या बाजारात आज भाजीपाल्याला काय दर मिळाला…

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान असल्याने बहुतेक बाजारसमित्यांमधील व्यवहारांना सुटी होती. आज सकाळी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे बाजारसमितीसह लासलगाव-पिंपळगाव या बाजारसमित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले. आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर जास्तीत जास्त ६ हजार असा […]
संपूर्ण गावाचा रासायनिक खते आणि औषधांवर खर्च शून्य; उत्पन्न मात्र झाले दुप्पट…

रासायनिक खतांच्या वापरामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्यासह माती आणि पाणीही प्रदुषित होत आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बनसारखे घटक कमी होऊ शेतकऱ्यांना नुकसानीचा किंवा कमी उत्पादकतेचा सामना करावा लागलो. एका गावातील शेतकऱ्यांनी मात्र हे चिञ बदलले आणि आता ते शंभर टक्के सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करत आहेत. या गावच नाव आहे हरनेड. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्हयात […]
मतदानानंतर आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव प्रसिद्ध; शेतकऱ्यांना डिझेलसाठी किती मोजावे लागणार पैसे?

दिनांक २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरूळीत पार पडले. आता २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असतानाच शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष मात्र इंधनाच्या दराकडे लागलेले आहे. मध्यंतरी माध्यमांतील बातम्यांनुसार निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच फटका बसणार होता. कारण आधीच खतांसह कृषी […]
ऊस गाळप हंगाम; मतदान आटोपले, आता ऊस तोडणीला येणार वेग…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मतदानानंतर ऊसाच्या तोडणीला वेग येणार असून गाळप हंगाम सुरळीत होणार आहे. यंदा ऊसाचा गाळप हंगाम निवडणुकीच्या मतदानानंतर सुरू करावा असा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न होता. तर साखर कारखानदारांना मात्र ऊस पळवापळवीची काळजी लागलेली होती. याचे कारण म्हणजे शेजारच्या कर्नाटक […]
ऊस तोडणीनंतर एकही रूपया खर्च न करता वाढवा सेंद्रिय कर्ब, कसा ते जाणून घ्या…

राज्यात ऊसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू असून आता राज्याच्या विधानसभा मतदानानंतर या कामाला वेग येणार आहे. ऊस तोडणीनंतर अनेक ठिकाणी पाचट जाळले जाते, किंवा इतर प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र योग्य पाचट व्यवस्थापनातून जमिनीला आश्चर्यकारक ठरतील असे फायदे होतात. ऊस तोडणीनंतर ऊसाचे पाचट सर्रासपणे जाळून टाकल्याने अतिशय उपयुक्त […]
या योजनेमुळे वृद्ध शेतकऱ्यांना मिळणार मोफत उपचार, कसे काढायचे कार्ड..

अलीकडेच केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना असे योजनेचे नाव असून त्या अंतर्गत नागरिक आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करवून घेऊ शकतात. ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण त्यासाठी एक कार्ड तयार करण्याची गरज आहे. 70 वर्षे आणि […]
हिवाळ्यात मागणी वाढल्याने खाद्यतेलांच्या किंमती वधारल्या? तेलबियांच्या किमती वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार का?

हिवाळ्यात मागणी वाढल्याने मागील सप्ताहात भारतातील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारात खाद्य तेलांच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व प्रकारची तेलं आणि तेलबियांचे बाजारभाव वधारल्याचे पाहायला मिळाले. या क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार सरकारने 14 नोव्हेंबर रोजी खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार कच्च्या पाम तेलाच्या (सीपीओ) आयात शुल्कात प्रति क्विंटल 80 रुपयांनी, सोयाबीन डेगमच्या आयात […]
खपली गव्हाचे आहेत असे फायदे? लागवड कराल तर फायदाच फायदा..

खपली गव्हाखाली सध्या मर्यादित क्षेत्र आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले आहे. परंतु खपली गव्हामध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे त्याचे महत्व कायम आहे. खपली गव्हाखाली भारतात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील बहुसंख्य खपली ही स्थानिक स्वरुपात खाण्यासाठी वापरली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात खपली गहू ठराविक जिल्ह्यामध्ये घेतला जातो. […]
विधानसभा मतदानामुळे राज्यातील बाजारसमित्यांमधील व्यवहार बंद…

आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदान असल्याने राज्यातील अनेक प्रमुख बाजारसमित्यांतील व्यवहारांना सुटी होती. नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांना मतदानानिमित्त सुटी असल्याने कांद्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. मात्र टोमॅटो साठी प्रसिद्ध असलेल्या गिरणारे, ता. नाशिक येथील बाजारात मतदानानंतर म्हणजेच आज सायंकाळी ६ नंतर टोमॅटोचे व्यवहार होणार होते. दरम्यान मुंबईतील पनवेल बाजारसमितीत भाजीपाल्याचे व्यवहार […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन या दिवसापासून सुरू होणार; शेतीच्या कोणत्या प्रश्नावर होणार चर्चा…

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा शेतीसह पर्यावरण, बदलते हवामान, वाणिज्य, प्रक्रिया उद्योग अशा अनेक बाबींवर चर्चा होणे अपेक्षित आहे. शेतमालाच्या हमीभाव वाढीच्या प्रश्नासह बदलत्या हवामानाचा शेती आणि उत्पादकांना बसणारा फटका, खते आणि कृषी निविष्ठांच्या वाढत्या किंमती, कृषी निर्यातीवर वाढते निर्यात मूल्य, कांदा, सोयाबीन, कापूस, दूध आणि ऊसाचे प्रश्न यावर […]