विधानसभा मतदानामुळे राज्यातील बाजारसमित्यांमधील व्यवहार बंद…

आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदान असल्याने राज्यातील अनेक प्रमुख बाजारसमित्यांतील व्यवहारांना सुटी होती.

नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांना मतदानानिमित्त सुटी असल्याने कांद्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. मात्र टोमॅटो साठी प्रसिद्ध असलेल्या गिरणारे, ता. नाशिक येथील बाजारात मतदानानंतर म्हणजेच आज सायंकाळी ६ नंतर टोमॅटोचे व्यवहार होणार होते.

दरम्यान मुंबईतील पनवेल बाजारसमितीत भाजीपाल्याचे व्यवहार झाले. याठिकाणी भेंडी, गवार, दुधी भोपळा, घेवडा, कारली, पडवळ, दोडका (शिराळी) टोमॅटो आदि व्यवहार झाले. आज टोमॅटोला पनवेला बाजारात सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

पुणे नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर या महत्त्वाच्या बाजारसमित्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील बहुतेक बाजारसमित्यांमध्ये मतदानामुळे शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *