ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली सप्टेंबरपासून पूर्ण राज्यात लागू, वाचा सविस्तर ..

जमीनधारकांना ऑनलाइन पद्धतीने मोजणीसाठी अर्ज करणे आणि शुल्क भरणे या बरोबर दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत एसएमएसद्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाइन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन २.० ही अद्ययावत संगणकप्रणाली पूर्ण राज्यात एक सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल.

ही संगणकप्रणाली भूमी अभिलेख विभागाने अद्ययावत केली आहे. ई-मोजणी २.० हे नव्या प्रणालीचे नाव आहे. यामध्ये जमिनीची हद्दकायम,कोर्टवाटप व कोर्टकमिशन ,पोटहिस्सा, बिनशेती, व विविध प्रकल्पांकरिता भूमिसंपादन आदींसाठी मोजणीचे काम केले जाते. प्रत्येक जमिनींच्या हद्दीचे अक्षांश व रेखांशाची माहिती मोजणी नकाशामध्ये प्राप्त होईल. दाखल होणाऱ्या मोजणी अर्जातील जमिनींची मोजणी ‘जीआयएस’आधारित रोव्हर्सद्वारे करण्यात येईल. परिणामी, जमीन मोजणी प्रकरणांमध्ये दोन मोजणींमुळे हद्दीत अंतर पडणे किंवा मानवी चुकांमुळे हद्दीबाबत होणाऱ्या चुका यांसारखे वाद तसेच तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

, सुरुवातीस वाशीम ,नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर सुरू करण्यात आला. या प्रणालीचा वापर एका वर्षांपूर्वी करण्यास सुरुवात झाली होती . तो यशस्वी झाल्यानंतर इतर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात ही प्रणाली लागू केली . यामध्ये जमीन मोजणीची कामे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यामध्ये सुरू करण्यात आले . त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये ती लागू करण्यात आली. संपूर्ण राज्यात ही संगणकप्रणाली लागू करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांनी काढला आहे.

ई मोजणी व्हर्जन २.० ची वैशिष्टे..

– ई मोजणी व्हर्जन २.० या प्रणाली च्या माध्यमातून जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार.

-मोजणी फी ऑनलाइन भरण्याची सुविधा प्रणाली वर उपलब्ध .

– अर्जाची सद्यःस्थिती ची माहिती एमएमएसने कळणार

– मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांशाची माहिती असणार.

– जमीन मोजणी प्रत ऑनलाइन मिळणार.

– जमिनीचे ‘लोकेशन’सुद्धा कळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *