शेतकऱ्यांना नफा देणारी अनेक पिके आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना फळ लागवडीतूनही भरपूर फायदा होतो. आंबा, सफरचंद, द्राक्षे, संत्री, पपई, केळी या फळांना तर खूप मागणी असते . या फळांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. या फळांशिवाय अशी अनेक फळेही आहेत. ज्यातून शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळू शकतात . आता या फळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात . आता काही शेतकरी नाशपाती या फळातून देखील नफा मिळू लागले आहे.
नाशपाती या फळाची मागणी वाढली आहे.
जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर ते बाजारात अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील केले जात आहे. यासोबतच हे फळ औषधी सुद्धा आहे. म्हणून डॉक्टरही हे फळ खाण्याचा सल्ला देतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे पचनसंस्थाही सुरळीत राहते. नाशपातीच्या आत फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. हे फळ खूप गोड आहे. त्यामुळे त्याचा वापर मिठाई बनवण्यासाठीही केला जातो.
पेरणीसाठी मार्च-एप्रिल हा योग्य काळ आहे
नाशपाती हे एक फळ आहे. जे उच्च तापमानात लागवड केली जाते . हे फळ या हंगामासाठी योग्य आहे. यामध्ये रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचाही वापर करता येतो. या फळाला नियमित पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर शेतकऱ्यांनी 1 एकरात 10 टन माल निघत असतो . यातून 5 ते 6 लाख रुपये शेतकरी मिळू शकतात.












