खालापूर येथील इर्शाळवाडीत दगड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचे पालकत्व शिंदे हे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत येथे जाऊन या मुलांचे पालकत्व स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी करतील .
या दुर्घटनेमध्ये बरेच लोक जखमी झाले. त्यातील 22 जणांचे निधनही झाले. इतर अनेकांना घरे सोडून दुसरीकडे जावे लागले.तसेच दुर्घटनास्थळी बचाव कार्य अजूनही सुरू आहे . मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून, तिथे अजूनही 86 जण अडकल्याची माहिती मिळत आहे.
श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्याद्वारे इर्शाळवाडीत मुलांची जबाबदारी घेण्यात येणार आहे . मुलांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत फाउंडेशन सहकार्य करेल , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांना घरे बांधून देण्याचे सांगितले आहे.
बऱ्याच मुलांनी या दुर्घटनेमध्ये त्यांचे आई वडील गमावले आहेत.. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना ,दुःख तसेच त्यांच्या डोळ्यासमोर आलेला अंधार त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परिस्थितीमध्ये त्यांच्या मागे ठाम उभे राहण्याची गरज आहे . समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पांगरणा खाली घेणे किंवा विश्वासाची उब देणे ही आपली जबाबदारी आहे.
या बाबी लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे कार्य हे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ने करण्याचे ठरवले आहे . या काळामध्ये येथील मुलांवर मोठा आघात झाला असला, तरी त्यांच्या आयुष्य सावरून जगण्याचे बळ त्यांना दिले पाहिजे . या मुलांचे शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशन कडून करण्यात येणार आहे . अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.