पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन तारीख ?

पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन तारीख

सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 3 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार आहे.  या आधी सरकारने 31 जुलै पर्यंत पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत दिली होती.

पिक विमा संदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.  ऑनलाइन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . तसेच राज्यात झालेली अतिवृष्टी यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.  इंटरनेट सेवा खंडित होती, लाईट समस्या होती तसेच सर्व्हेर  डाऊन होते यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिक विमा भरता आला नाही.  त्यामुळे सरकारने या अडचणी लक्षात घेऊन पिक विमा साठी मुदतवाढ दिली आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेतील सगळी माहिती ऑनलाईन माध्यमातून भरली जाते.  पण गेल्या अनेक दिवसापासून पिक विमा उतरवताना  शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसापासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्य प्रकारे चालत नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.

तसेच अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चक्रा मारत होते.  पण ऑनलाइन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.त्यामुळे काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणे पसंत केले होते

3 ऑगस्ट पर्यंत ची मुदत 

पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेली तारीख जवळ येत होती . त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे या प्रकरणाविषयी लक्ष द्यावे व वेबसाईट सुरळीत करून पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.  शेतकऱ्यांच्या याच मागणीचा विचार करून राज्य सरकारने तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *