प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने २७ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हफ्त्याचे पैसे जमा केले आहे. देशातील आठ कोटी होऊन अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे . डीपीडी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, 8.5 कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 17000 कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली. पण आता या योजनेमध्ये बदल होणार आहे. आणि याचाच फायदा कोट्यावधी शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरेल.
काय होणार बदल
पुढील वर्षात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावर्षी पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा जागर होत आहे . सूत्रांच्या माहितीवरून शेतकरी सन्मान निधी योजनेत बदल होण्याची शक्यता आहे . प्रत्येक वर्षी या योजनेत दोन हजार रुपयांची वाढ होणार आहे.
इतकी होईल रक्कम
सध्या या योजनेत दरवर्षी जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. वार्षिक सहा हजार रुपये निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम जमा होत असते. या योजनेत एक हप्ता वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक आठ हजार रुपये जमा होतील.
यापूर्वी पण चर्चा
जानेवारी महिन्यामध्ये ही चर्चा रंगली होती. फेब्रुवारी 2023 पासून केंद्र सरकार जादा हप्त्याची तरतूद करेल, असा दावा करण्यात येत होता. केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा करण्यात येणार होती. मात्र निवडणुकीपूर्वी हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे..
बजेट पण तयार
या योजनेत आणखीन एक हप्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्र सरकारने योजनेचा 14 वा हप्ता जमा केला. या योजनेसाठी जवळपास 17 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने खर्च केले.
योजनेला झाले पाच वर्ष
ही योजना डिसेंबर 18 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित होती . पण आता या योजनेचा विस्तार झाला असून सगळ्यात शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
या शेतकऱ्यांना नाही लाभ
ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील व सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दहा हजार रुपये मानसिक पेन्शन घेणारे सेवानिवृत्तांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजने चा लाभ घेता येणार नाही.