
Agricultural Marketing : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ दिनांक २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून त्या निमित्त विद्यापीठाने कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी पदवीधर, पीएचडी आणि उच्च पदवीधर झालेत त्याची यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यानुसार एमबीए होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असून कृषी मालाच्या विक्री आणि व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्याची ही पुढची पीढी आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यंदा तब्बल ३७ विद्यार्थी एमबीए झाले आहेत. कृषी अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढत असून १३६ विद्यार्थी कृषी अभियांत्रिकीमध्ये बी टेक झाले असून २४० विद्यार्थी जैव तंत्रज्ञान पदवीधर म्हणजेच बी.टेक झाले आहेत.
दरम्यान विद्यापीठाचा २६वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण ३४६२ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात येणार आहे.
दीक्षांत समारंभात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे २९ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवीचे ३०७ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे ३१२६ स्नातकांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभात एकूण ६० पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, दात्यांकडून देण्यात येणारे १० सुवर्ण पदके, १ रौप्य पदक आणि ११ रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असुन २४ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे, अशी माहिती कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी दिली.
आचार्य पदवी:
पी. एचडी. (कृषि) : २८
पी. एच. डी. (गृहविज्ञान): ३
पी. एचडी. (अन्नतंत्रज्ञान): १
एकुण आचार्य पदवीचे स्नातक : २९
पदव्युत्तर अभ्यासक्रम:
एम. एस्सी. (कृषि) : २०४
एम. एस्सी. (उद्यानविद्या) : ३२
एम. एस्सी. (कृषि जैवतंत्रज्ञान ) : ८
एम. एस्सी. (गृहविज्ञान) : ७
एम. टेक. (अन्नतंत्रज्ञान) : १३
एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी): ९
एम.बी.ए. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) : ३४
एकुण आचार्य, पदव्युत्तर पदवी आणि पदवीचे स्नातक : ३४६२