शेतकरी सातत्याने आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात . त्यामधून चांगले उत्पन्न देखील मिळवण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण कधी कधी शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक संकटाचा फटका बसतो.
तसेच शेतकऱ्यांना स्वीट कॉर्न मक्याची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. कोणत्याही हंगामात स्वीट कॉर्न ला मोठी मागणी असते. स्वीट कॉर्न मका देशाबरोबरच प्रदेशात देखील लोकांना आवडते . त्यामुळे देशातील शेतकरी या मक्याच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
स्वीट कॉर्न च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरच चांगले उत्पन्न मिळते.
स्वीट कॉर्न ची लागवड ही मक्याच्या लागवडी सारखीच असते. स्वीट कॉर्नच्या लागवडीत मका पक्व होण्याआधीच काढली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच चांगले उत्पन्न मिळते. स्वीट कॉर्न सह शेतकरी फुलांची लागवड करून ही चांगला नफा कमवू शकतात . तसेच मसाला पदार्थाची लागवड करूनही शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. स्वीट कॉर्न काढणी ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. स्वीट कॉर्न ची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करा. यामुळे पीक जास्त काळ ताजे राहते. काढणी पूर्ण झाल्यावर बाजारात विकावे . स्वीट कॉर्न जास्त काळ साठवून ठेवू नका . त्यामुळे त्याचा गोडवा कमी होईल.
स्वीट कॉर्न ची लागवड करत असताना या गोष्टींकडे लक्ष द्यावे.
जेव्हा तुम्ही स्वीट कॉर्न ची लागवड करत असतात , तेव्हा तुम्ही सुधारित जातीची निवड करा. कीटक प्रतिरोधक वाण कमी वेळेत तयार होते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत चांगली करून घ्या. निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी . जेणेकरून पिकात जास्त पाणी साचणार नाही, स्वीट कॉर्नचे उत्पादन संपूर्ण भारतात होत असले तरी सर्वाधिक उत्पादन हे उत्तर प्रदेश मध्ये घेतले जाते. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये स्वीट कॉर्न उत्पादन घेता येते.
स्वीट कॉर्न हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे.
स्वीट कॉर्न मका जेवढे खायला चविष्ट असते. तेवढीच ती आरोग्यासाठी ही फायदेशीर असते. स्वीट कॉर्न मध्ये विटामिन ए, विटामिन ई, विटामिन बी, मिनरल आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व आढळतात. स्वीटकॉर्न अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. स्वीट कॉर्न मुळे अन्नपचन होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते. मक्याची पोळी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो, आणि कार्डियोव्हॅस्क्युलरचा धोकाही कमी होतो. मक्याच्या पिठामध्ये बीटा कॅरटीन ,नावाची तत्व आढळतं. हे तत्त्व रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करतं. त्यामुळे हे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही.