शेतकऱ्यांना कमी खर्चात पपईच्या लागवडीतून अधिक नफा मिळतो.

पपई हे फळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. पपईच्या लागवडीतून शेतकरी भरपूर नफा कमवू शकतात . आत्माराम सिंग यांनी पपई या पिकातून भरपूर नफा मिळवला. आज आपण त्यांची यशोगाथा पाहणार आहोत . ते गुरियारी या गावात राहतात . 1990 मध्ये त्यांना बिरौली पुसा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.मनसा राम यांनी पपईची लागवड करण्याचा सल्ला दिला होता . त्यानंतर त्यांनी पपईची लागवड केली, यातून त्यांनी लाखोंचा नफा कमवला .

अशा प्रकारे पपईची आधुनिक शेती केली जाते..

आत्माराम सिंग यांनी सांगितले की पपई या पिकाला पाणी वेळेवर मिळावे यासाठी शेतात ड्रीपर व स्प्रिंकलर बसविण्यात आले आहे. पपई च्या बागेमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला जातो त्यामुळे पीक उत्पादन चांगले होते. आवश्यकतेनुसार कीटकनाशकेही वापरली जातात . पपई शेती ही कमी खर्चात चांगली नफा देणारी शेती आहे. शेतकरी आत्माराम सांगतात की १९९० मध्ये आजूबाजूचे लोक अल्प प्रमाणात पपईची लागवड करायचे. त्यावेळीही ते एक एकरात पपईची लागवड करायचे. पपई या फळाची शेती केल्यानंतर आमच्या शेतात आलेली फळे पाहण्यासाठी शास्त्रज्ञ यायचे. यासोबतच भविष्यात कोणती शेती करावी याच्या सूचनाही ते देत असत.

वार्षिक उत्पन्न :

सध्या एका झाडापासून 2000 ते 2500 रुपये त्यांना मिळतात . दर महिन्याला उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर 10 ते 12 क्विंटल पपईची विक्री होते. तयार झालेली पपई स्थानिक बाजारपेठेतच विकली जाते. जर आपण वार्षिक उत्पन्नाबद्दल बोललो तर ते 5 लाखांपर्यंत जाते. तयार झालेले पीक 30 ते 50 रुपये किलो दराने बाजारात विकले जाते. आत्माराम सांगतात की ते पुसा ड्वार्फ आणि पुसा डोलसेरा या जातींची लागवड करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *