मान्सून दरवर्षीपेक्षा उशिरा दाखल झाला आहे त्यामुळे राज्यामध्ये पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे अकोल्यासह अनेक राज्यांमध्ये मूग उडीद आणि तुरीच्या पेरण्या लांबल्या आहेत.मात्र तरीही या पिकांची पेरणी करून शेतकऱ्यांचा चांगला फायदा घेऊ शकतो असे कृषी तज्ञांचे मत आहे.
पेरणीला उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत.
विदर्भातून मान्सूने यंदा महाराष्ट्रात नक्कीच प्रवेश केला आहे मात्र आत्तापर्यंत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. मान्सून लांबल्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत होता. पावसाअभावी मूग, उडीद ,आणि तुरीची पेरणी ही लांबी आहे. शेतकऱ्यांच्या या काळजीवर काही प्रमाणात मात करण्यासाठी डॉ. सुहास लांडे, शास्त्रज्ञ, कडधान्य विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ, अकोला यांनी सांगितले की ,7जुलै ते 10 जुलै या दरम्यान चांगला पाऊस झाल्यानंतरही मुग आणि उडीद या पिकाची पेरणी करता येते.
शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास चांगले पिक घेता येईल.
मूग, उडीद ,आणि तुर, यांची पेरणी मिश्र पीक म्हणून करता येते .असे त्यांनी सांगितले दोन पिकांमध्ये मूग आणि उडीद या एकाच ओळीच्या पिकांची पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. याचबरोबर तुर पेरणीसाठी 15 जुलै पर्यंतचा कालावधी आहे त्या अगोदर बीच शुद्धीकरणाची प्रक्रिया करून चांगले पीक घेता येते.
गतवर्षीही शेतकऱ्यांच्या पेरणीला झाला होता उशीर.
गतवर्षी देखील मान्सून उशिरा आला होता याचबरोबर अनेक राज्य मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे पिकांची पेरणी देखील लांबली होती याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला पेरणी उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.