Aadhaar Card : शेतकरी बांधवांनो, आता आधारकार्डची गरज संपली, कशी ते जाणून घ्या…


Aadhaar Card : शेतकरी बांधवांसह सामान्यांसा आता सरकारी कामांसाठी आधारकार्ड किंवा झेरॉक्स बाळगण्याची गरज उरणार नाही. केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी ओळख प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरक्षित केली आहे. ‘फेस आयडी’ म्हणजेच चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर आता आधार ओळख म्हणून केला जाणार आहे.

नवीन मोबाईल अ‍ॅपद्वारे ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना बँकेत खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, सिमकार्ड घेणे किंवा कोणत्याही सरकारी सेवा मिळवताना आधारकार्डची छायाप्रत (फोटोकॉपी) दाखवण्याची गरज भासत नाही. त्याऐवजी चेहऱ्याची स्कॅनिंग करून थेट ओळख पटवता येणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे कागदपत्रांची झंझट टळणार असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अनेक वेळा आधारकार्ड हरवणे, जुने होणे किंवा फोटोकॉपी नसणे यामुळे अडथळे येत असतात. आता केवळ चेहरा ओळखून सर्व सेवा सहज मिळणार असल्याने वेळेची आणि खर्चाची बचत होणार आहे.

सरकारने हे अ‍ॅप सार्वजनिक वापरासाठी लवकरच उपलब्ध होईल, असे जाहीर केले आहे. यामुळे आधारशी संबंधित फिंगरप्रिंट किंवा ओटीपी प्रक्रियाही टाळता येणार आहे. या निर्णयामुळे डिजिटल ओळख अधिक सुरक्षित, सोपी आणि पेपरलेस झाली असून, शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

यासंबंधी अधिक माहितीसाठी UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.