
kanda bajarbhav : आज हनुमान जयंती असून महावीर जयंतीही आहे. त्यामुळे लासलगाव, निफाड बाजारसमित्यांसह राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये कांदा लिलावाला सुटी आहे. मात्र काही बाजारसमित्यांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे.
आज दिनांक १० एप्रिल २५ रोजी खेड चाकण बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी ११०० रुपये, जास्तीत जास्त १५०० रुपये आणि सरासरी १३०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला आहे. पुणे बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात लोकल कांद्याला ११ हजार २३२ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ६०० रुपये, जास्तीत जास्त १६०० रुपये आणि सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
आज पुणे बाजारात किमान बाजारभावात आणि सरासरी बाजारभावात घट झाल्याचे दिसून आले. तर खेड चाकण बाजारात कालच्या तुलनेत आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले.
दरम्यान पिंपरी बाजारात आज सरासरी १५०० रुपये, मोशी बाजारात सरासरी ८५० रुपये सरासरी प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. या ठिकाणी बाजार फारच घसरल्याचे दिसून आले. कमीत कमी बाजारभाव ३००, जास्तीत जास्त १४०० रुपये प्रति क्विंटल मिळाले.