पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

शेतकऱ्यांना शेतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी भारत सरकार नवनवीन तंत्रे उपलब्ध करून देत आहे. या तंत्रांमध्ये संरक्षित लागवडीचे तंत्र समाविष्ट आहे.शेतकरी हंगामी पिकांची लागवड करून या तंत्राद्वारे चांगला नफा मिळवू शकतात. संरक्षित लागवड तंत्रांतर्गत, विविध भाज्या, फळे आणि फुले संरक्षित संरचनेत लागवड करता येतात.  पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊसमध्ये संरक्षित लागवडीअंतर्गत शेतीचे पर्याय दिले जातात.

शेतकऱ्यांनी पॉलीहाऊसमध्ये शेती केली तर अनेक फायदे मिळतात. शेतकरी प्लॅस्टिकच्या रचनेत या तंत्राद्वारे हंगामी भाजीपाला सहज पिकवू शकतात.विशेषत: ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमिन कमी आहे, ते शेतकरी पॉलीहाऊसमध्ये भाजीपाल्याची आधुनिक शेती करून चांगला फायदा करून घेऊ शकतात. यामुळे मोकळ्या जागेचा उपयोग तर होईलच, पण चांगल्या उत्पन्नामुळे शहरांकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचे   स्थलांतरही थांबू शकेल. 

पॉलीहाऊस काय आहे? 

पॉलिहाऊस म्हणजे लोखंड आणि प्लास्टिकच्या थरांनी बनलेली एक सीमा भिंत आहे.  जी कीटक,  रोग आणि हवामानापासून पिकांचे संरक्षण करते.  एकदा लोखंडा पासून बनलेल्या पॉलिहाऊस ची रचना सुमारे आठ ते दहा वर्ष पर्यंत चालवता येते.  परंतु कालांतराने प्लास्टिकचा थर खराब होतो त्यामुळे दरवर्षी किंवा दोन वर्षांनी तो बदलावा लागतो . परंतु मिळालेल्या उत्पन्नातून याचा खर्च वसूल केला जातो.

कसे वापरायचे?

पॉलिहाऊस हे शेतीचे अतिशय प्रभावी आणि सोपे तंत्रज्ञान आहे.  स्वतः कृषी विभागाची तज्ञ व अधिकारी शेतकऱ्यांना लागवडीसाठी मदत करतात . पॉलिहाऊस हे जमिनीपासून थोड्या उंचीवर करून बांधले जाते ,जेणेकरून सुरक्षित संरचनेत पाणी भरू  नये आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये कृषी तज्ञांच्या मते पॉलिहाऊस चे पडदे सकाळी काही वेळ उघडावेत त्यामुळे पिकांना निसर्गाचा स्पर्श मिळतो. 

पॉलिहाऊस ची रचना बाजारपेठेच्या जवळच्या भागात किंवा रहदारीच्या ठिकाणी बसवावी पॉलिहाऊस मध्ये फक्त भाज्या फळे आणि फुले पिकवली जातात . ज्यांना जवळच्या बाजारपेठेमध्ये जास्त मागणी असल्या कारणामुळे चांगला नफा मिळण्यात मदत होते. 

फायदे काय आहेत ?

कमी जमिनीतून अधिक नफा मिळवण्यासाठी पॉलिहाऊस हे तंत्रज्ञान वापरावे त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की या रचनेत शेतकरी देशी विदेशी तसेच हंगामी आणि अतिशय कमी खर्चात पीक घेऊ शकतात.  पॉलिहाऊस मधील शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो.  ज्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. 

पॉलिहाऊस ची रचना ही एक बंद रचना आहे.  ज्यामध्ये कीटक येण्याची शक्यता कमी असते.  त्यामुळे कीटकनाशकाचे वापरावर बचत होते.  सुरक्षित शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.  पॉलिहाऊस मध्ये शेती केल्यामुळे अवकाळी पाऊस, उष्णता, दुष्काळ ,गारपीट, जोरदार वारा यापासून पिकाचे संरक्षण होत असते . पॉलिहाऊस मधील शेतीमुळे मानवी श्रम आणि आर्थिक बचत होते.  या तंत्रज्ञानात पिकांना खताची गरज नसते.  फक्त शेणखत किंवा गांडूळ खत वापरून चांगले उत्पादन मिळवता येते. 

किती खर्च येईल? 

पॉलीहाऊस शेतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने स्वतः अनुदानाची तरतूद केली आहे . भारत सरकार 65 टक्के आर्थिक अनुदान देण्यास तयार आहे.  म्हणजेच पॉलिहाऊस शेतीसाठी खर्चाच्या 65 टक्के पर्यंत मिळत आहे.  राज्य सरकारने ही शेतीच्या या खर्चात आपल्या परीने योगदान दिले आहे. 

पॉलीहाऊसमधील  शेतीला चालना देण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना लागू केली आहे.  या योजनेअंतर्गत सुरक्षित संरचना मध्ये शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे . एवढेच नव्हे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची ही तरतूद सरकारने केली आहे.  इच्छुक शेतकरी यांनी जवळच्या कृषी विज्ञान केंद्र,  कृषी अधिकारी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाशी संपर्क साधू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *