Milk Rate : पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दुधाचे विक्रीदर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती,वाचा सविस्तर…

वाढती उष्णता व दूध संकलनामध्ये हळूहळू होणारी घट त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत दुधाचे विक्रीदर वाढण्याची अनुकूल स्थिती तयार होऊ शकते, अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिली.

मागणीमुळे दुधाच्या मागणीत मोठी वाढ झालेली नाही. परिणामी राज्यामध्ये सध्या तरी दूध टंचाईसारखे चित्र दिसत नाही. राज्याच्या एकूण दूध संकलनात उन्हाळा व दुधाचे कमी खरेदीदर यामुळे ८-१० टक्के घट झालेली आहे. असे श्री. कुतवळ यांच्या सांगितले , परंतु त्यामुळे दुधाचे खरेदी दारात झटपट वाढ होईल , अशी स्थिती सध्याची नाही. पुढील महिन्यामध्ये मात्र दुधाचे दर वाढू शकतात. ही दरवाढ नेमकी किती होईल , याचा अंदाज सध्या सांगता येणार नाही.

परंतु दूध दरवाढीसाठी दूध भुकटीचे बाजार व लोण्याचे बाजार अनुकूल चित्र दाखवत आहेत. लोण्याचे दर दूध प्रकल्पांसाठी प्रतिकिलो ३३० रुपयांच्या आसपास आहेत.दूध भुकटीच्या दरामध्ये वाढ होऊन तो २१५ पासून २२५ रुपयांपर्यंत गेली आहे.

भविष्यात “दूध भुकटीचे व लोणी च्या दरात वाढ झाली तर चित्र बदलू शकते. यामुळे दुधाचे खरेदीदर शेतकऱ्यांना वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूल स्थिती तयार होऊ शकते,” असे श्री. कुतवळ यांनी सांगितले .

लोण्याचे दर आणि दूध भुकटी अपेक्षितरीत्या वाढलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदीदरात निश्चित किती व कधी वाढ होईल, याचा अंदाज बांधता येत नाही.
श्रीपाद चितळे, संचालक, चितळे डेअरी उद्योग समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *