PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले कि नाही या पद्धतीने जाणून घ्या ..

देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, अनुदान आणि इतर गोष्टी मिळतात. अशाच एका मोठ्या योजनेचे नाव आहे पीएम किसान योजना, ज्याद्वारे शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात एकूण ६,००० रुपये जमा केले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये येतात. मात्र, आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने व अन्य कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळू शकलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकरी या योजनेची स्थिती कशी तपासणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

योजनेचा 16 वा हप्ता लवकरच जारी केला जाईल…

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबर 2023 मध्ये जारी करण्यात आला होता, त्यानंतर शेतकरी आता 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस 16 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. याचा अर्थ येत्या काही आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचतील.

ई-केवायसी करणे आवश्यक ..

जर तुम्ही पीएम किसान योजने च्या लाभासाठी ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रकिया पूर्ण केली नाही तर पीएम किसान योजने च्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल . योजनेशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी नियमांनुसार, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.ज्या शेतकऱ्यांनी अजून ही ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रा मध्ये ई-केवायसी करू शकता. तुम्ही बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करू शकता. pmkisan.gov.in च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन देखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. याशिवाय तुमच्या जवळच्या बँकेत तुम्ही जाऊन हे काम करून घेऊ शकता.

पीएम किसान योजनेची स्थिती कशी तपासायची?

◼️ शेतकर्‍यांना हप्त्याचे पैसे खात्यात येत आहेत की नाही, हे कसे कळणार? यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान लाभार्थी दर्जा आणि पीएम किसान लाभार्थी यादी पाहावी लागेल.

◼️ तुम्हाला अधिकृत वेबसाइट – https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.

◼️ यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान योजनेचे ऑनलाइन पोर्टल उघडेल.
त्याठिकाणी तुम्हाला Know Your Status हा पर्याय दिसेल.

◼️ यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला लाभार्थी स्थिती दिसू लागेल. तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *