मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील वसंतराव नाईक कृषि संशोधन केंद्राद्वारे तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाण विकसित करण्यात आला त्यास हैद्राबाद येथे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
या वाणाची शिफारस हि भारताच्या मध्य विभागासाठी व महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस केलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे हि याची विशेष बाब आहे.
यापूर्वी तुरीच्या वाणाच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने केलेले आहेत आणि शेतकऱ्यांची भरीव आर्थिक उन्नती बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाणामुळे साधली जाईल .
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी नमूद केल्यानुसार हा संकरित वाण लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल .
बिडिएनपीएच १८-५ वाणाची वैशिष्ट्ये..
◼️ या वाणाची प्रति हेक्टरी उत्पादकता १७५९ ते २१५९ किलोग्रॅम
◼️ दाण्याचा रंग पांढरा
◼️ १५५ ते १७० दिवसात हा वाण तयार होतो.
◼️ हा वाण तुरीच्या मर आणि वांझ या प्रमुख रोगांकरिता मध्यम प्रतिकारक आहे.
◼️किडींना कमी बळी पडतो.
सदर वाण विकसित करण्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. व्ही. के. गीते या शास्त्रज्ञांनी डॉ. के. टी. जाधव,डॉ. पी. ए. पगार आणि डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे , डॉ. डी. के. पाटील, प्रशांत सोनटक्के, यांच्या सहकार्याने हा वाण प्रसारित करण्यात आला .
विद्यापीठामध्ये हा वाण प्रसारामुळे उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृषि संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले .