कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा या प्रकारे करा बंदोबस्त..

कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले आहे , कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींमध्ये मावा, फुलकिडी, तुडतुडे, यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नियमित सर्वेक्षण

प्रत्यक्ष शेतांना नियमित भेटी देऊन पिकाचे आणि किडीचे निरीक्षण करावे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
पिकाला गरजेची असणारी अन्नद्रव्य योग्य वेळेत द्यावेत , त्यामुळे पिकाची जोमदार वाढ तर होईलच तसेच पीक किडीच्या प्रादुर्भावाला कमी बळी पडण्यास मदत होईल . नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.रासायनिक खतांचा शिफारसीनुसार वापर करावा.

तण व्यवस्थापन
शेताची खुरपणी ,कोळपणी व रासायनिक तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची आठ ते नऊ आठवड्यामध्ये तणांचे व्यवस्थापन करावे.

पिवळे व निळे चिकट सापळे
एक हेक्टरसाठी निळे (५) व चिकट सापळे पिवळे (१५) (१.५- १.० फूट आकाराचे) पीक २० दिवसाचे झाल्यावर लावावे.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी
फुलकिडे – १० फुलकिडे/पान
मावा – १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रसत झाडे किंवा १० मावा/पान
तुडतुडे – २ ते ३ पिल्ले/पान

रासायनिक कीटकनाशके
बुप्रोफेझिन २५% एससी २० मिली किंवा फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन २० डब्ल्युजी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *