
सरकारने 2024-25 हंगामासाठी ऊस उत्पादकांसाठी रास्त आणि लाभदायक किंमत (FRP)25 ते 340 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो 2014 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. मंत्री मंडळाच्या (CCEA) बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय, 5 कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच जीवनमाण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने घेतलेला आहे. नवीन एफआरपी, जी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल, जी उत्पादन खर्चापेक्षा 107% जास्त आहे.सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकारने केलेली हि घोषणा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी करते .
ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या 2024-25 हंगामासाठी कारखान्यांनी ऊस उत्पादकांना किमान FRP किंमत 25 ते 340 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्याचा निर्णय सरकारने बुधवारी घेतलेला आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केलेली ऊसासाठीची ही सर्वोच्च रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) आहे. मोदी सरकारने एकाच वेळी एफआरपी प्रति क्विंटल 25 रुपयांनी वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट कमिटीच्या (CCEA) बैठकीत एफआरपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात ऊसाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. CCEA ने 2024-25 साठी उसाची एफआरपी 340 रुपये प्रति क्विंटल साखर रिकव्हरी 10.25 टक्के दराने मंजूर केली आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना दिली.
“ही उसाची ऐतिहासिक किंमत आहे जी चालू हंगामाच्या 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा सुमारे 8 टक्क्यांनी जास्त आहे,” असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
नवीन एफआरपी उसाच्या A2+FL किमतीपेक्षा 107 टक्क्यांनी जास्त आहे, असे ठाकूर म्हणाले, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल.
“जगाच्या तुलनेत,भारतात उसाला सर्वाधिक चांगली किंमत भेटत आहे,” असे मंत्री म्हणाले.
सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल असे त्यानी सांगितले.