बेसन ,डाळ मध्ये कसा झाला ब्रॅण्ड तयार ,वाचा सविस्तर …

वाळवा तालुक्यातील कुरळप गावशिवारात ऊस हे प्रमुख पीक असून बहुतांश क्षेत्रावर हळद, खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली आहे . याच गावात राहत असलेला अश्विनी मुकुंद पाटील यांच्या कुटुंबाची दीड एकर शेती असून त्यामध्ये उसाची लागवड केली आहे.परंतु त्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी पूरक उद्योगाचा विचार केला.

पूरक व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारन्यासाठी त्यांनी बेसन निर्मितीची तांत्रिक माहिती घेतली. बेसन उत्पादनास २०१९ मध्ये यंत्राची खरेदी करून टप्याटप्याने सुरवात केली. यासाठी घरच्यांची चांगली मदत मिळाली.

बेसन निर्मिती व्यवसायाला कोरोना काळामध्येच सुरवात झाली. या काळात विक्री करणे हे थोडे आव्हानात्मक ठरले. मोठी बाजारपेठ बंद असल्याने स्थानिक बाजारपेठेतील दुकानांसह घरी वापरण्यासाठी बेसनची मागणी लक्षात आली.त्यानुसार बेसन पिठाची मागणी लहान-मोठ्या दुकानदारांकडून होऊ लागली आहे.

पंचक्रोशीत मार्केट उभारणे सहज शक्य झाले. बेसन विक्रीची जबाबदारी अश्विनीताईंच्या पती मुकुंद यांनी घेतली असून सुरवातीला बेसनचे २०० ग्रॅम आणि ५०० ग्रॅम नमुने लहान दुकानदार,बाजार , वडापाव निर्माते अशा ठिकाणी देण्यास सुरवात केली.बेसनच्या गुणवत्तेमुळे दुकानदारांच्याकडून मागणी वाढली.बाजारपेठेत बेसन उत्पादनास स्वतंत्र ओळख मिळण्यासाठी त्यांनी ‘राजवर्धन’ ह्या नावाने ब्रॅण्ड निर्माण केला.

डाळ मिलची उभारणी

अश्विनीताईंना बाजारपेठेत बेसन निर्मितीसाठी डाळ खरेदी करताना पहिल्या टप्यांत बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागले . कधी जास्त दराने डाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे अडचणीवर मात करन्यासाठी शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला तर असा त्यांनी विचार केला. आणि स्वतः डाळ मिल उभारली . त्यानुसार नेवासा हेरवाड डाळ मिल प्रकल्पाची पाहणी (जि.कोल्हापूर) आणि (जि.छत्रपती संभाजीनगर) येथे केली.

या ठिकाणी तीन दिवस डाळ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असून सहा लाख रुपयांचे डाळ मिल विकत घेण्यात आली. या उद्योगासाठी त्यांना वाळवा तालुकातीळ कृषी विभागात असले अधिकारी जयदीप पाटील ,नागेश जमदाडे, विवेक ननावरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. ३५ टक्के अनुदान कृषी विभागातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेतून मिळाले. अश्विनीताईंनी २०२२ मध्ये डाळ निर्मिती उद्योगाला सुरु केली.

त्यांनी नियोजन केले कि सांगली, सातारा जिल्ह्यातील बाजारपेठेतून विविध डाळींच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्याचा आहे. कोणत्या बाजारात त्यांनी प्रक्रियेसाठी मूग,तूर,उडदाची उपलब्धता किती आहे, दर किती आहें आहे,याचा अभ्यास सुरु केला . लवकरच मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ तयार करून विक्री करनार . असा आराखडा तयार केला आहे.

सध्या बाजारपेठेतील मागणी पाहता बेसनाच पीठ ७५ ते ८० रुपये किलो आणि हरभरा डाळ ७२ ते ७५ रुपये किलो दराने विकले जाते. या प्रक्रिया उद्योगातून दर महिन्याचा उलाढालीतून व्यवस्थापन खर्च, मजुरीची रकम काडून पाच ते दहा टक्के नफा शिल्लक रहातो. या उद्योगामध्ये दोन महिलांना अश्विनीताईंनी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील बचत गटाच्या सदस्या आश्विनीताई देखील आहेत. त्यामुळे गावातील महिलांना शेतीपूरक व्यवसायाबाबत त्या मार्गदर्शन करत असतात.

उद्योगाचे व्यवस्थापन

– हरभरा डाळीची खरेदी स्थानिक शेतकरी, परिसरातील व्यापाऱ्यांकडून करतात .

– उद्योगाचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसआय) परवाना गरजेचा आहें.

– बेसन आणि डाळ विक्रीचे नियोजन गाव परिसर तसेच वडगाव (जि.कोल्हापूर),वाळवा (जि.सांगली),माळशिरस (जि.सोलापूर) येथे करण्यात आले .

– दर महिन्याला चार टन बेसन आणि एक टन डाळ अशी विक्री होते .

– दहा,वीस,पन्नास किलो पिशवीमध्ये बेसन पॅकिंग. डाळीचे वीस,तीस किलोमध्ये पॅकिंग.

– हरभरा डाळीची मागणीनुसार निर्मिती आणि विक्री. ‘राजवर्धन” ब्रॅंडने बेसन आणि डाळीची विक्री.

Leave a Reply