खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान राज्य सरकारने आज वितरित केले आहे.  या अनुदान वितरणाचा आज पहिला हप्ता ऑनलाइन च्या माध्यमातून वाटप करण्यात आला आहे. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार,  पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचे निर्णय घेतला होता.

या अनुदानाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे.  उर्वरित अनुदानाच्या दुसऱ्या टप्पा लवकरच देण्यात येईल. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यामध्ये दर कमी असल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकून दिला होता . बाजारात कमी दर होते यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात आले होते.  त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती.  आज मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

मोघरपाडा ठाणे येथील एमएमआरडीएला मेट्रो कारशेडसाठी  जागा  हस्तांतरीत

जानेवारीत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय महोत्सव. 

राज्यात सायबर सुरक्षिततेसाठी 837 कोटीचा प्रकल्प. 

सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतील राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. 

एनसीडीसी पेक्षा कमी व्याजदरात कर्ज केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट

मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरासाठी मुद्रांक शुल्कात कपात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *