CBSE Pattern In Maharashtra: सरकारचा ऐतिहासिक निर्णय , महाराष्ट्रामधील शाळांमध्ये राबवणार सीबीएससी पॅटर्न

Maharashtra school

CBSE Pattern In Maharashtra : महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना शिक्षणासाठी केंद्रीय शाळा म्हणजेच सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये घालताना दिसून येत आहेत. राज्यातील पालकांचा सीबीएससी कडे ओढा वाढताना दिसून येतोय आणि याचाच परिणाम म्हणजे राज्यातील महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील असलेल्या शाळांमधील प्रवेशाचे प्रमाण कमी होऊन या शाळा ओस पडत चाललेल्या दिसून येत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता एक महत्त्वाचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएससी पॅटर्न दिसणार आहे राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएससी चा पॅटर्न 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली पासून राबविला जाणार आहे आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दोन टप्प्यामध्ये हा पॅटर्न राज्यभरामध्ये राबविला जाणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे असं सुद्धा सांगितलं जातंय नेमका काय आहे निर्णय कशासाठी हा निर्णय घेतला जातोय हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात.

नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषी २४ तास ( krishi24.com) ,आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावं त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी आता पालक सीबीएससी बोर्डामध्ये त्याच्या मुलांना टाकताना दिसून येत आहेत परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील दर्जेदार शिक्षण मिळावं स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुलं मागे पडू नयेत यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी चा अभ्यासक्रम आता शिकवला जाणार आहे. मागील वर्षी केंद्र सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनं सुद्धा नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे या नवीन धोरणानुसार राज्य सरकारनं इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीआरटी ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा सुद्धा जाहीर झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये या संदर्भातला मसुदा मागच्या वर्षी जाहीर जाहीर करण्यात आलेला होता .आता याच धोरणाचा भाग म्हणून राज्यातील शाळांच्या वार्षिक वेळापत्रकांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठा बदल केला जाणार आहे आणि सीबीएससी प्रमाणेच आता आपल्या इथं स्टेट बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्यांचं सुद्धा एकूण वेळापत्रक सारखं असणार आहे . त्या संदर्भातली शिफारस करण्यात आलेली आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत .शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर आणण्यासाठी आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्नचा अंगीकार करून त्यात आपल्या राज्याप्रमाणे आवश्यक ते बदल करण्या संदर्भातल्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.

त्याच्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 मध्ये इयत्ता पहिलीला सीबीएससी चा पॅटर्न लागू होईल आणि 2026-27 मध्ये इतर इयत्तांना हा सीबीएससी चा पॅटर्न लागू केला जाणार आहे आणि त्याच्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार केला जाईल त्याच्यासाठी नवीन पाठ्यपुस्तक तयार केली जातील आणि ती बालभारती मार्फत छापली जातील अशी कार्यवाही केली जाणार आहे. यासोबतच या वर्षभरामध्ये मध्ये शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा बंद केल्या जाणार नाहीयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत .काही शाळांमध्ये मात्र पटसंख्या शून्य आहे अशा ठिकाणी मात्र शाळांचा परत एकदा विचार केला जाणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनं अर्थातच एससीआरटी यांनी इयत्ता तिसरी ते 12 वी साठीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केलेला होता त्याला अंतिम मान्यता सुद्धा मिळालेली आहे. त्याच्यामुळं आता आपल्या इथल्या ज्या शाळा आहेत सर्व स्टेट बोर्डाच्या शाळा त्यांच्यासाठी सीबीएससी पद्धतीचा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे यासोबतच येणाऱ्या काळामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल पासून सुद्धा सुरू होणार आहे . राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांचा अभ्यास करून आपल्या इथं त्या संदर्भातला आराखडा जाहीर करण्यात आलेला होता आता. आपल्या स्टेट बोर्डासाठी सीबीएससी चा पॅटर्न जो आहे तो जर का अवलंबवायचा असेल त्याचा जर का स्वीकार करायचा असेल तर त्यांची पाठ्यपुस्तकं ही इंग्रजी आणि हिंदी माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत त्याचं मराठीमध्ये भाषांतर करणं आवश्यक राहील यासोबतच आवश्यक त्या सर्व माध्यमांमध्ये ही पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे देण्यात आलेली आहे.

इतिहास आणि भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तकं स्थानिक राज्य राष्ट्रीय आणि जागतिक अशा आशयाची करण्यात येणार आहेत. मराठी भाषेची पाठ्यपुस्तकं राज्यातच तयार होतील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी म्हणजे ज्याला आपण क्रेडिट पॉईंट्स म्हणतो हे सर्व काही करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अभ्यास करण्यासाठीचा कालावधी उपलब्ध करून देणं सुद्धा आवश्यक असणार आहे .देशभरामध्ये एसएससी आणि सीबीएससी हे दोन्ही बोर्ड अत्यंत लोकप्रिय आहेत अनेक शाळा या दोन्ही बोर्डाशी संलग्न आहेत खूप सारे जण आमची शाळा सीबीएससी ची शाळा आहे असं सांगून जाहिरात करताना सुद्धा दिसून येतात तर हे सीबीएससी बोर्ड जे आहे हे केंद्रीय बोर्ड आहे ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं , एसएससी बोर्ड जे आहे ते आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं म्हणजेच दोन्ही बोर्डांचा अभ्यासक्रम आणि तिथलं एकूण शिक्षण जे आहे हे दोन्हीही वेगवेगळे आहेत कारण की सीबीएससी चा जो पॅटर्न आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे ते एनसीईआरटी तयार करतं तर आपला इथला एसएस चा जो अभ्यासक्रम आहे तो राज्य सरकारचा शिक्षण विभाग तयार करत सीबीएससी हे एक राष्ट्रीय बोर्ड असल्यानं ते शिक्षण आणि संवादाचं माध्यम म्हणून इंग्रजीला जास्त प्राधान्य देताना दिसून येतं तर एसएससी हे आपलं महाराष्ट्र सरकारचं बोर्ड असल्यानं ते मराठी हिंदी किंवा इतर जी कोणती प्रादेशिक भाषा आहे त्यांना प्राधान्य देताना दिसून येतात आणि या शाळांमध्ये इंग्रजी पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून शिकवली जाते आता सीबीएससी च्या बहुतेक शाळा जर का बघितल्या तर त्या खाजगी शाळा आहेत आणि तिथला एकूण खर्च हा एसएससी पेक्षा सुद्धा सुद्धा अधिक आहे आता एसएससी जे आहे ते आपल्या राज्य सरकार द्वारे चालवलं जाणारे बोर्ड आहे सार्वजनिक शाळा आहेत . खाजगी शाळांमध्ये सुद्धा इथला अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे शुल्क कमी आहेत तरीसुद्धा आता या ठिकाणी पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येते सीबीएससी चा संपूर्ण देशभरामध्ये एकच सिलॅबस आहे त्याच्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाताना किंवा जर का तसा फरक पडला तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या एकूण शिक्षणामध्ये फरक पडत नाही आणि या विद्यार्थ्यांना त्याच्याशी नवीन राज्याशी यासोबतच तिथल्या नवीन शाळेशी जुळून घेणं अवघड जात नाही आता आपल्या इथं जर का एसएससी चा स्टुडंट असेल आणि तो जर का दुसऱ्या राज्यामध्ये काही कारणास्तव जावं लागलं त्याला तर त्याला तिथे जुळून घेणं प्रचंड अवघड जातं त्याच्या एकूणच शिक्षणामध्ये मर्यादा येतात यासोबतच हे सुद्धा सातत्याने समोर आलेलं आहे की सीबीएससी बोर्डाचा अभ्यास करणारे विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यश मिळवताना दिसून येतात आणि त्यांचा जो आहे पॅटर्न हा विशिष्ट पॅटर्न जो आहे अभ्यास करण्याचा किंवा एकूण त्यांचा पाठ्यपुस्तकाचा त्याचा त्यांना त्यांच्या करिअर मध्ये निश्चितपणे फायदा होतो .

आता आपल्या इथं सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळत असलं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे एसएससी बोर्ड आहे त्याच्यावरती जरी दर्जेदार शिक्षण मिळत असलं तरीसुद्धा ही गोष्ट नाकारून चालणार नाही की गेल्या काही वर्षांपासून सीबीएससी पॅटर्नला ऍडमिशन घेण्याचं प्रमाण वाढलेला आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा या आता जो नवीन अभ्यासक्रम येणार आहे किंवा नवीन आपले इथं एज्युकेशन पॉलिसी जी लागू केली जाणार आहे त्याच्यासाठी शैक्षणिक वर्ष सुद्धा 1 एप्रिलला सुरू करणं आणि 31 मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालानं एकूण शैक्षणिक वर्ष संपवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. मे महिन्यामध्ये उन्हाळी सुट्टी असेल आणि 1 जून पासून पुन्हा शाळा सुरू करण्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे दीर्घकालीन सुट्ट्या काही नसणार आहेत .अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे सुरू ठेवण्याची सुद्धा शिफारस याच्यामध्ये आहे परंतु या एकूणच सर्व गोष्टींना राज्य शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटना हरकत नोंदवण्याची शक्यता नाकारता येत नाही आता हे सर्व का केलं जातंय म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय स्तरावरती आणली राज्यामध्ये सुद्धा आणली जाते सीबीएससी चा पॅटर्न सुद्धा आणला जातोय तर बघा आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रचंड वाढलेला आहे राज्यातील आपल्या मुलांना सीबीएससी ,आयसीएससी च्या बोर्डाच्या मुलांबरोबर स्पर्धा करावी लागते आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरती सक्षम करण्यासाठी हे सर्व बदल जे आहेत ते केले जात आहेत यासाठी , शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी जे आहे ते एका शाळेची जबाबदारी स्वीकारतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. शाळेमधल्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवणं शाळेच्या विकासामध्ये हातभार लावण्याची जबाबदारी जी आहे ती सुद्धा निश्चित केली जाणार आहे आणि याच्यामध्ये मंत्री महोदयांपासून अधिकारी सर्वजण सहभाग घेणार आहेत या सगळ्या गोष्टीतून शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवरती येणार असल्याचा विश्वास सरकार द्वारे व्यक्त केला जातोय, आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर आमच्या कृषी २४ तास ( krishi24.com) च्या व्हाट्सअँप ग्रुप ला नक्की जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *