
केंद्र सरकारने येत्या सात तारखेला 2023 – 24 खरीप हंगामासाठी म्हणजेच पिकाच्या किमान आधारभूत किमती (एम एस पी ) जाहीर केल्या . हमीभाव म्हणून आधारभूत किमती ओळखल्या जातात.
सोयाबीनची गेल्या हंगामातील किंमत ही चार हजार तीनशे रुपये होती . तर 2023-24 या हंगामासाठी आधारभूत किंमत प्रतिक्विंटल चार हजार सहाशे रुपये असेल.
मध्यम धाग्याच्या कापसाची गेल्या हंगामात सहा हजार अंशी रुपये किंमत होती. तर ह्या हंगामामध्ये कापसाचे आधारभूत किंमत ही प्रतिक्विंटल सहा हजार सहाशे वीस रुपये असेल . तसेच लांब धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत ही सहा हजार अंशीवरून ती आता 7000 वीस रुपये करण्यात आलेले आहे.
तुरीची गेल्या हंगामात 6600 रुपये आधारभूत किंमत होती. तर ह्या हंगामामध्ये तुरीची किंमत प्रतिक्विंटल 7000 रुपये असेल, तसेच मूग आणि उडदाच्या आधारभूत किमती 8558 ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये असतील तसेच गेल्या हंगामामध्ये त्या किमती 7755 व सहा हजार सहाशे रुपये होत्या.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहाराविषयी समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आधारभूत किमतींना मान्यता दिली आधारभूत किमतीच्या शिफारसी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने केंद्र सरकारला केल्या होत्या.
शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा पिकांमध्ये वैविध्य यावे , यासाठी खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. असे पियुष गोयल यांनी सांगितले.