शेती नाही,तर कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, जाणून घ्या..

शेती नाही,तर कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, जाणून घ्या..

प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पैशाची व नोकरीची गरज भासत असते. परंतु शेती करणारे लोक हे दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात . आज तुम्हाला आम्ही करिअर विषयी शेती क्षेत्राशी निगडित पर्याय कोणते उपलब्ध आहेत ते आज सांगणार आहोत . या पद्धतीने करिअर केल्याने चांगल्या नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील.पाहुयात करिअर कोणत्या संधी आहेत .

यामध्ये कृषी अभियंता प्रथम क्रमांक आहे.

दरवर्षी आणि विद्यार्थी बी टेक करतात तुम्ही कधी कृषी क्षेत्रामध्ये बीटेक केल्याचे ऐकले आहे का? कृषी क्षेत्रामध्ये अभियंता होऊन खूप पैसे कमवू शकतात. तुम्ही कॉम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी देखील शिकू शकता. त्यामुळे शेती संबंधित एकापेक्षा जास्त मशीन तयार करू शकता.

जर तुम्हाला कृषी क्षेत्रात अभियांत्रिकी करायची असेल, तुमच्याकडे गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाचे ज्ञान चांगले पाहिजे . यामुळे तुम्ही एकापेक्षा जास्त मशीन बनवू शकाल.

कृषी अर्थशास्त्रज्ञ हा दुसरा पर्याय

जर तुम्ही वाणिज्य शाखेमध्ये असाल तर तुम्ही कृषी अभियंता न होता अर्थशास्त्रज्ञ होता येईल यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंगही करू शकता यामुळे चांगला मिळतो .

तुम्ही खूप वेळा बघितले असेल कृषी अर्थतज्ज्ञ वादविवादाच्या पटलावर बसून किंवा टीव्ही चॅनेलवर शेतकऱ्यांविषयी बोलत असतात . शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांबाबत चर्चा करत असतात. अशा वादग्रस्त मुद्यांवर बोलण्यासाठी त्यांना भरपूर पैसे दिले जातात.

फार्म मॅनेजर हा तिसरा पर्याय आहे.

या नोकरीची संधी परदेशात तसेच मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध आहे. या नोकरीसाठी तुम्हाला एखाद्याची शेती सांभाळावी लागते .यासोबतच तुमच्याकडे फार्म मॅनेजरचे काम आहे की शेतातून उत्पादित केलेली उत्पादने बाजारात विकून शेतमालकाला भरपूर नफा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *