शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून सोयाबीनला हमीभाव 300 रुपयाने वाढवून प्रतिक्विंटल 4600 करण्यात आलेला आहे.
तुरीला हमीभाव चारशे रुपयांनी वाढून सात हजार रुपये करण्यात आलेला आहे . मोदी सरकारने 2023 – 24 च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या आधारभूत किमतीत 640 रुपयांची वाढ दिली आहे.
805 रुपयांची सर्वाधिक तिळाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तसेच आठशे तीन रुपयांची मुगाच्या हमीभावात वाढ करण्यात आली .
आधारभूत किंमतींच्या शिफारशी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने सरकारला सादर केल्या.किमान 50 टक्के पिकांच्या उत्पादन खर्चावर नफा देऊन हमीभाव निश्चित करण्यात आले, पीयूष गोयल यांनी सांगितले.
82 टक्के बाजरीला उत्पादनखर्चापेक्षा सर्वाधिक हमीभाव देण्यात आला. 58 टक्के तुरीसाठी उत्पादन खर्चावर हमीभाव देण्यात आला असे पियुष गोयल यांनी सांगितले.