शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे भाताचा ‘हा’ वाण, शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा हा वाण?

शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे भाताचा 'हा' वाण, शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा हा वाण

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते.  हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक दृष्टिकोनातून हे पीक महत्वपूर्ण आहे.  या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्याही पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापनाच्या सोबतच पिकांची व्हरायटी म्हणजेच वान दर्जेदार असणे खूप गरजेचे आहे. त्यापासून  मिळणारे उत्पादन देखील भरघोस स्वरूपाचे मिळते.

देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्थांचा या नवनवीन आणि दर्जेदार वानांच्या विकासामध्ये मोलाचा सहभाग असतो. याच दृष्टिकोनातून राज्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिरगाव येथे भात संशोधन केंद्र आहे .

या संशोधन केंद्राने रत्नागिरी 8 या जातीची संशोधित केलेली भाताच्या जातीच्या लागवडीकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतो. नेमकी रत्नागिरी 8 म्हणजे सुवर्णा-मसुरा या वाणाची कोणती वैशिष्ट्य आहेत? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहित घेऊ.

रत्नागिरी 8 या वाणाची वैशिष्ट्ये

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा वाण चवीला उत्तम असून याचा दाणा हा मध्यम बारीक असतो.लागवडीनंतर 135 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो . 2019 मध्ये रत्नागिरी तालुक्यात असलेल्या शिरगाव भात संशोधन केंद्राच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे .फार कमी कालावधीमध्ये या वानाने सिंधुदुर्ग तसेच पालघर , रत्नागिरी, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

एवढेच नाही तर विदर्भ मध्ये देखील या वाणाला अधिक मागणी आहे . तसेच महाराष्ट्र , बिहार , आंध्र प्रदेश,  छत्तीसगड,  तेलंगणा या राज्यांमधून देखील या वानाला चांगलीच पसंती मिळालेली आहे.  या वाणाचे  सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे बदलते हवामानामध्ये देखील हा वान चांगला टिकणारा असून उशिरा पाऊस पडला तरी याला फटका बसत नाही.  साधारणपणे लागवडी नंतर 135 ते 140 दिवसांमध्ये हे पीक तयार होते.

कापणी जर वेळेवर या वाणाची केली तर तांदळाचे तुकडे होण्याचे प्रमाण देखील कमी असते.  तसेच उंचीला मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही . कडा करपा किंवा करपा या रोगांना चांगला प्रतिकारक असून वेळेवर पेरणी व लागवड केल्यास किडीचा प्रादुर्भाव देखील अत्यल्प प्रमाणात होतो.  अशा अनेक कारणामुळे हा वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *