पावसाची स्थिती सप्टेंबर महिन्यात कशी राहील? काय म्हणतात पंजाबराव डख? वाचा माहिती

पावसाची स्थिती सप्टेंबर महिन्यात कशी राहील काय म्हणतात पंजाबराव डख वाचा माहिती

सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे.  आणखीन दोन दिवस राज्यामध्ये पावसाची पोषक परिस्थिती नसल्याचे देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे.

पावसाने आणि खंड दिल्यामुळे अनेक भागामधील पीक आता हातचे जाण्याची वेळ आली आहे . पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली असून गेल्या दोन दिवसापासून राज्यातील मराठवाडा व विदर्भात तसेच काही भागांमध्ये थोडेफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली.  परंतु हा पाऊस पुरेसा नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा आता शेतकरी बंधूंना आहे.

जर या बाबतीत हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर कोकण व मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामान खात्याकडून चोवीस ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा जोर वाढणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल असे सांगितले आहे.

सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या स्थितीबाबत पंजाबराव डख यांचा अंदाज

या सगळ्या चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये हवामानाच्या बाबतीत लोकप्रिय असलेले नाव पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला असून त्यांच्या मते सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास पंधरा दिवस पावसाचा खंड राहणार आहे . म्हणजे ते एक सप्टेंबर पासून 15 सप्टेंबर पर्यंत राज्य मध्ये पावसाचा खंड राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यानंतर मात्र 16 ते 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडेल असा त्यांनी हवामान अंदाज वर्तवलेला आहे.  जर पंजाबराव यांचा सप्टेंबर महिन्यातील हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडेल हे मात्र निश्चित.  परंतु सप्टेंबरच्या 16 ते 30 या तारखेपर्यंत पावसाचे आगमन चांगल्या प्रकारे राहिले तर खरीप पिकांना  जीवदान मिळेल व शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल.  गुरुवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *