आनंदवार्ता !  गायब झालेला पाऊस पुन्हा बरसणार,पहा हवामान अंदाज ..

आनंदवार्ता !  गायब झालेला पाऊस पुन्हा बरसणार,पहा हवामान अंदाज ..

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अध्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही,  त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आशा आहे . परंतु राज्यात काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.  मात्र तीन दिवसापासून पुन्हा पावसाने विश्रांती दिली आहे . त्यात आज पुन्हा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.  उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे . मात्र बहुतांश भागात अध्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.  शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. 

पुन्हा पावसाला पोषक हवामान झाल्याने आज भंडारा, गोंदिया गडचिरोली ,जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट तर नागपूर ,चंद्रपूर जिल्ह्यात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे . उर्वरित विदर्भ, मराठवाडा ,खानदेशात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. 

पुणे विभागात चांगला पाऊस. 

राज्यात काही भागांमध्ये अद्यापही अपेक्षित चांगला पाऊस झालेला नाही आतापर्यंत पुणे विभागात सरासरी 836.3 मिलिमीटर पैकी 492.6 मिलिमीटर म्हणजेच उगा 58% पाऊस पडला असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे दरम्यान बंगालच्या उपसागरावर पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र उडीसा ते उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे . त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रसह मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे.

वायव्य बंगालच्या  उपसागरामध्ये कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.  त्याला लागून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे ही प्रणाली आणखीन आज आणखीन तीव्र होण्याचे संकेत असून शनिवार पर्यंत ओडिसा,  छत्तीसगड कडे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

453 मंडळात पावसाचा खंड. 

गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्यात पावसाने हजेरी लावली होती . मात्र पाऊस राज्यात सर्वत्र झाला नसून,  काही भागात झाला तसेच या पावसामुळे खरिपाच्या पिकांना पूर्णतः दिलासा मिळाला नाही उलट 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडळाची संख्या आता वाढून 453 पर्यंत पोहोचले आहे.  कृषिमंत्र्यांच्या एक सप्टेंबर च्या अहवालानुसार 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळांची संख्या कमी झालेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *