आज पश्चिम बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये याचा परिणाम कमी जास्त प्रमाणात पाहण्यास मिळणार आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवस सांगितलं आहे . तसेच ३ दिवस अलर्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह हवामान खात्याने इतर काही राज्यांना देखील अलर्ट केले आहे . मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, काही भागात खरोखरच मुसळधार पाऊस पडू शकतो, यवतमाळ , चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसासोबत जोरदार वारे वाहू शकतात.
हवामान विभागाने छत्तीसगड व विदर्भ या ठिकाणी आज मुसळधार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली आहे . त्यामुळे पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते .
द.अंदमान समुद्रात व बंगाल उपसागर,यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र ८ मे ला तयार होणार आहे अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली . तसेच ९मे पर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे .
कालावधीमध्ये समुद्र अधिक खवळलेला राहील. त्यामुळे पर्यटकांना व मच्छिमारांना समुद्रकिनारी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे . तसेच समुद्रकिनाऱ्या जवळच्या गावांना सतर्क राहण्याच्या देखील इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पंजाब , जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश याठिकाणी पावसाबद्दल यलो अलर्ट देण्यात आला आहे . वादळ आणि पावसाची शक्यता दिल्ली-एनसीआरमध्येही वर्तवली आहे .