पंजाबराव डख हवामान अंदाज; ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार? महाराष्ट्रात कमी कालावधीत पडणार जास्त पाऊस…

पंजाबराव डख हवामान अंदाज; ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार? महाराष्ट्रात कमी कालावधीत पडणार जास्त पाऊस...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.राज्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे.  महाराष्ट्र मध्ये दुष्काळ पडणार की काय अशा चर्चा आता शेतकऱ्यांच्या बांधावर रंगत आहेत.  त्यामुळे कृषी आणि कृषी निगडित व्यवसायांमध्ये खूपच नरमाई पाहायला मिळत आहे . कृषी संबंधित बाजार पूर्णपणे दबावात आहेत.

शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे पावसाबाबत अजूनही संभ्रमावस्था असल्याचे चित्र दिसत आहे.  दरम्यान हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  म्हणून शेतकऱ्यांच्या काळजीमध्ये अधिकच वाढ झाली आहे . परंतु ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.  यांच्या माहितीनुसार राज्या मध्ये यावर्षी दुष्काळ पडणार नसून कमी कालावधीत जास्तीत जास्त पाऊस पडणार आहे.

आणखीन जवळपास अडीच महिने  पावसाचे असून  या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  व राज्यातील जवळपास सर्व धरणे फुल भरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

सध्या काही राज्यातील धरणे भरलेली आहेत तर काही धरणातून विसर्ग सुरू आहे.  या व्यतिरिक्त पंजाबराव डंक यांनी पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत देखील माहिती दिली आहे.

केव्हा पडणार जोरदार पाऊस? 

पंजाबराव डख यांनी सांगितले की 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट च्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत. पण राज्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर खऱ्या अर्थाने वाढणार आहे. स्वतंत्र दिनानंतर मोठ्या पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला असून राज्यामध्ये 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे.

या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पाऊस पडण्याची शक्यता आहे . विशेष बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आ. हे एवढेच नाहीत ऑक्टोबर  महिन्यातही अशीच परिस्थिती राहणार आहे.  15 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबर दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे. 

निश्चितच पंजाब रावांचा अंदाज खरा ठरला तर निश्चितच  या वर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणे चांगला समाधानकारक पाऊस राहीलआणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात देखील भर पडण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply