Kanda Bajarbhav today : तीन दिवसात उच्चांकी कांदा आवक, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Kanda Bajarbhav today : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्‌यातील बाजारातील कांदा आवक वाढली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दररोज सरासरी दीड लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील कांदा आवकही वाढत असून मागील तीन दिवसात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. मागील आठवड्यात राज्यात सरासरी दररोज तीन लाख किव्ंटल आवक होताना दिसली.

सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी राज्यात कांद्याची उच्चांकी आवक झाली. एकूण ४ लाख ६६ हजार क्विंटल आवक एकाच दिवशी राज्यात झाल्याने कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात दबावात आले. सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची ५० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची १ लाख ६४ हजार क्विंटल, पोळ कांद्याची २६ हजार क्विंटल, तर उन्हाळी कांद्याची १२५५ क्विंटल आवक झाली. त्या खालोखाल नगर जिल्ह्यातही मोठी आवक झाल्याचे पाहायला मिळाले. नगर जिल्ह्यात १ लाख ४३ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. पुणे जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाली.

मंगळवारी राज्यातील कांदा आवकेत काहीशी घट होऊन ३ लाख ५४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. मागच्या आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी राज्यातील आवक सुमारे तीन लाख क्विंटलपर्यंत पोहोचली होती. या आठवड्यात त्यात सुमारे २० टक्क्यांनी वाढ दिसून आली. त्यात सोलापूर जिल्हयात सुमारे ४८ हजार क्विंटल, तर नाशिक जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख क्विंटल कांदा आवक एकाच दिवशी झाली. नगर जिल्हयात सुमारे ४० हजार कांदा आवक झाली. त्यामुळे कांदा दर पुन्हा दबावात आले, तरी सोमवारच्या तुलनेत एक ते दोन रुपयांनी पडले.

काल बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी बाजारातील आवक काहीशी घटून ३ लाख क्विंटलपर्यंत आली. नाशिक जिल्हयात लाल कांद्याची १ लाख १२ हजार, तर पोळ कांद्याची सुमारे २१ हजार क्विंटल आवक झाली. सोलापूर जिल्ह्यात ४३ हजार क्विंटल आवक झाली, तर नगर जिल्हयात ४८ हजार क्विंटल आवक झाली.

सद्या राज्यात लाल कांद्याला सरासरी २ हजार ते २१०० रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *