Pomegranate farming : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांसह आपली भेट घेतल्याचे लिहिले आहे. या भेटीच्या फोटोंत काही शेतकरी पंतप्रधानांना डाळिंबाची भेट देताना दिसत आहेत. दरम्यान साखर कारखान्यांच्या प्रश्नावरही यावेळेस श्री. पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे.
दुसरीकडे या पंतप्रधान मोदींना भेटलेल्या या शेतकऱ्यांची चर्चा आता सुरू आहे. अनेकांना प्रश्न पडलाय की हे तरुण शेतकरी कोण आहेत? कुठल्या जिल्ह्यातील आहेत. आज त्याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेले हे शेतकरी तरुण डाळिंब उत्पादक शेतकरी असून ते नैसर्गीक पद्धतीने डाळिंबाची शेती करतात. त्यांची शेती सातारा जिल्हयात आहे. वाठार निंबाळकर, तालुका फलटण हे त्यांचे गाव. प्राप्त माहितीनुसार सुरूवातीला या शेतकऱ्यांनी ८ एकर डाळिंब शेती केली. नैसर्गीक पद्धतीने त्यांनी डाळिंब पिकवून त्यांनी वर्षभरातच ८० लाखांचे उत्पन्न घेतले. त्यांचे नाव आहे अहिरेकर बंधू आहे.
सध्या अहिरेकर बंधूंची २० एकर डाळींब लागवड असून पंचक्रोशीत ते डाळिंबाचे प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा, सोलापूर, सांगली, नाशिक, नगर जिल्ह्यातील दुष्काळी, तसेच कमी पावसाच्या प्रदेशात अनेकांनी डाळिंबाची लागवड केली असून त्याला आधुनिक तंत्राची जोड देत उत्तम शेती केली आहे. सध्या भारतीय डाळिंबाची आखाती देशांसह युरोपातही निर्यात होत आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले आहे.