नवे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी आवक आणि दर कसे आहेत, वाचा सविस्तर ..

विदर्भातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.  या बाजारात मागील महिन्यातील 27 सप्टेंबर पासून आतापर्यंत 20000 इतकी क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे . असे असताना सोयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत.  मागील अनेक दिवसापासून.सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आताच असल्याचे चित्र आहे.

अकोल्याच्या बाजारात 9 ऑक्टोंबर रोजी सोयाबीनची 814 इतकी क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे होता.  तर कमीत कमी 3700 पासून जास्तीत जास्त चार हजार 470 रुपयांपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे.

मागील काही दिवसातील सोयाबीन आवक आणि दरा संदर्भात चित्र पाहिले तर 27 सप्टेंबरला अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी तीन हजार पाचशे ते चार हजार 765 रुपयांपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला होता . तर सरासरी भाव चार हजार सहाशे रुपयांपर्यंत होता . या दिवसापासून बाजारात सोयाबीनच्या आवक मध्ये तेजी यायला लागली होती.  27 तारखेला १ हजार ५४९ क्विंटल अधिक सोयाबीनची आवक झाली होती.

या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या आवक मध्ये काहीशी घसरण पाहिला मिळाली.  परंतु महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात तेजी आली.  तीन ऑक्टोंबर रोजी या बाजारात १४२७ एवढी आवक झाली असून चार हजार सहाशे रुपये इतका सोयाबीनला दर मिळाला.  कमीत कमी चार हजार पासून जास्तीत जास्त 4755 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनला भाव मिळाला होता.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोंबर पासून सोयाबीनच्या दरात 165 रुपयांनी अवके मध्ये घसरण पाहायला मिळाली.  किमान 3505 पासून 4590 पर्यंत कमाल भाव इतका होता.  पाच ते सहा ऑक्टोबर रोजी सोयाबीनचे आवक आणि दर स्थिर राहिले.

9 ऑक्टोंबर रोजी सोयाबीनची आवक कमी झाली असून 814 इतकी क्विंटल झाली , परंतु दर घसरल्याचे चित्र दिसले . कमीत कमी 3700 पासून जास्तीत जास्त 4470रुपये इतका भाव असून सरासरी भाव चार हजार दोनशे रुपये पर्यंत पोहोचला.

अकोल्यामध्ये इतर धान्याला कसा आहे भाव.. 

या अकोल्याच्या  बाजारामध्ये तुरीला कमीत कमी 7000 आणि जास्तीत जास्त दहा हजार 900 रुपये प्रति क्विंटल मागे भाव मिळत आहे.  तर हरभऱ्याला 3700 पासून जास्तीत जास्त 5750 रुपये असा भाव आहे.  6000 पासून दहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मुग धान्याला दर मिळत आहे.

Leave a Reply