
kanda bhazarbhav : आज दिनांक 3 मे 2025 रोजी म्हणजेच आठवडष्याच्या शेवटी दुपारी ४ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण 92 हजार 344 क्विंटल तर लाल कांद्याची एकूण 7 हजार 239 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी 980 रुपयांचा दर मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी 772 रुपयांचा दर मिळाला.
राज्यात सर्वाधिक उन्हाळी कांद्याची आवक नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत झाली. येथे तब्बल 31 हजार 460 क्विंटल कांद्याची नोंद झाली. दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सर्वाधिक सरासरी बाजारभाव मिळाला, जो 1400 रुपयांपर्यंत पोहोचला.
लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांदा दर तुलनेने टिकून राहिले. आजही या बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १२०० रुपये दर मिळला. मात्र पिंपळगाव बसवंत येथील दरांत १०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला सरासरी 1150 रुपयांचा दर मिळाला.
पुणे मोशी बाजारात उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 800 रुपया आणि लाल कांद्याचा दर 750 रुपया इतका होता. सोलापूर बाजारात लाल कांद्याला 650 रुपया दर मिळाला. राहुरीतील वांबोरी उपबाजारात उन्हाळी कांद्याचा सरासरी दर 700 रुपया इतका होता.
छत्रपती संभाजीनगर येथील बाजारात लाल कांद्याला सरासरी 650 रुपया दर मिळाला. नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 1400 रुपया सरासरी दर मिळाला. सांगली बाजारात लाल कांद्याला सरासरी 900 रुपया दर मिळाला. कोल्हापूर येथे लाल कांद्याला सरासरी 1000 रुपया दर मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बाजारात, क्रमांक १ गटात उन्हाळी कांद्याला सरासरी 1100 रुपया दर मिळाला.
ही दरवाढ व घट विविध बाजारांतील मागणी, पुरवठा, साठवणूक क्षमता आणि स्थानिक हवामानावर अवलंबून आहे. बाजारपेठेतील हे बदल शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवहारासाठी महत्त्वाचे संकेत देतात.