ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल ? पहा हवामान अंदाज ..

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल पहा हवामान अंदाज ..

विदर्भ आणि कोकण, घाट माथ्यावर पुढील दोन दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने  वर्तविला आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर  अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी वाऱ्याचा पश्चिम पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे.

तसेच कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता दक्षिण छत्तीसगड मध्ये कमी झाली आहे.   वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्याच्या मधील क्षेत्र (शिओर झोन)  दक्षिणेकडे सरकलेला आहे . राज्यात मोसमी पाऊस पडण्यास ही स्थिती अनुकूल नाही.  त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण, घाटमाथा ,विदर्भात, काही ठिकाणी हलका पाऊस होईल . त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन , ऑगस्ट महिन्यामधील पहिले दहा दिवस कोरडे जातील.अगदी किनारपट्टीवरही तुरळक सरी होतील.   या दिवसात राज्यात फारसा पाऊस होणार नाही.  मोसमी वाऱ्याचा पश्चिम पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यामुळे मोसमी पाऊस हरियाणा, पंजाब ,उत्तर प्रदेश, बिहार, इत्यादी राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

राज्यात दोन दिवस हलक्या सरी

आज पासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल, पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी ,घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होईल, त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल ,कोकण किनारपट्टी पुणे जिल्ह्याचा घाट परिसर ,सातारा आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ऑगस्ट मधील पावसाच्या खंडाची कारणे काय? 

एल-निनो सक्रिय; पण त्याचा मोसमी पावसावर परिणाम नाही.

मोसमी वाऱ्याचा पश्चिम पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला.

वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्यामधील क्षेत्र (शिओर झोन) दक्षिणेकडे सरकले.

दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी.

बंगालच्या उपसागरामध्ये ढग नसणे.

इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत. 

Leave a Reply